Headlines

सोने 1,56,560 रु. तोळा, चांदी 2,78,100 रु. किलो:सव्वा तासात सोने 1,339 तर चांदीची 11 हजार 330 रुपयांनी जोरदार उसळी




होर्मुझसह अन्य मुद्द्यांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीन शांतता प्रस्ताव फेटाळून लावल्याने सोमवारी सोने-चांदीच्या दराने उसळी घेतली. जळगावच्या सराफा बाजारात संध्याकाळी ५ वाजता १,५५,२२१ रुपये तोळा असलेले सोने सव्वा तासात १,३३९ रुपयांनी वाढून १,५६,५६० वर पोहोचले तर २,६६,७७० रुपये किलो असलेली चांदी ११,३३० ने वाढून २,७८,१०० वर पोहोचली. रात्री उशिरापर्यंत ही तेजी कायम होती. ११ मे रोजी सराफ बाजाराची सुरुवात किंचित घसरणीने झाली. रविवारी असलेल्या दराच्या तुलनेत सोमवारी संध्याकाळी ५ वाजता सोने ५१५ रुपये तर चांदी १०३० रुपयांनी कमी होते. मात्र सव्वा तासांनी संध्याकाळी ६.१५ वाजता तेजी आली. रविवार,१० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलनाची बचत करण्यासाठी नागरिकांना वर्षभर अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यामुळे सोमवारी सुरुवातीला बाजारावर विक्रीचा दबाव दिसून आला. पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे दागिन्यांच्या विक्रीत तात्पुरती मंदी येऊ शकते; मात्र, सोने विक्रमी उच्चांकावरून खाली असल्याने आणि मागणी कमी राहील अशी शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मानणे आहे. अस्थिर डॉलर, मागणी-पुरवठा साखळीतील विषमतेमुळे सोने-चांदीत चार दिवसांपासून अस्थिरता आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळनंतर सोने-चांदीत तेजी आली असली तरी घसरणही शक्य आहे, असे सराफा बाजाराचे तज्ज्ञ विजय लष्करे यांनी सांगितले. तारीख/वेळ सोने (प्रति तोळा) चांदी (प्रति किलो) १० मे (रविवार) १,५५,७३६ २,६७,८००
११ मे (सायं ५ वा.) १,५५,२२१ २,६६,७७०
११ मे (सायं ६:१५ वा.) १,५६,५६० २,७८,१००



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *