![]()
शहरातील सोनबर्डी येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात चार वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या संबंधित अभियंता (इंजिनियर) आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या
.
नगरपालिकेत निवेदन देताना राष्ट्रवादीचे नेते दिलीप खोडपे, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, नगरसेवक जावेद मुल्लाजी, गोपाळ राजपूत, सचिन बोरसे, अविनाश बोरसे, आकाश बंडे यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून कारवाई न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. सोनबर्डी येथील जलतरण तलावात नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे गेल्या वर्षभरातील ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. ३ मे रोजी कार्तिक गणेश पाटील या चार वर्षाच्या निष्पाप बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या निवेदनाद्वारे पक्षाने मृताच्या वारसांना नगरपालिकेकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि सुरक्षा रक्षकांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनात नमूद केले आहे की, ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जलतरण परिसरात अधिक क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कायमस्वरूपी चोख सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत. या घटनेतील दोषींविरुद्ध सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही पक्षाने केली आहे.