Headlines

Ajit Pawar Merger Controversy; Anil Deshmukh Claims Sunil Tatkare Lied


“अजितदादा हयात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी सत्तेतून बाहेर पडून पुन्हा एकत्र यावे, असे आमच्यात ठरले होते. यासंदर्भात जयंत पाटील यांच्या घरी आणि त्यानंतर बारामती येथे स्वतः अजित दादा आणि आमच्या पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थ

.

माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून खासदार सुनील तटकरे यांच्या दुटप्पी भूमिकेचा अक्षरशः पंचनामा केला. तसेच शरद पवार यांच्या भूमिकेचा दाखला देत आजच्या घडीला दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

दादांच्या उपस्थितीत विलीनीकरणाच्या बैठका झाल्या होत्या!

सुनील तटकरे यांच्या ताज्या विधानावर पलटवार करताना अनिल देशमुख यांनी संपूर्ण घटनाक्रमच मांडला. “अजितदादा हयात असताना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजित दादांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी सत्तेतून बाहेर पडून एकत्र यावे, हे पूर्णपणे ठरले होते. ही चर्चा काही लपून नव्हती.”

प्रांताध्यक्षपदापर्यंत चर्चा झाली होती

“या एकत्रीकरणासाठी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती, ज्यात एकत्र आल्यानंतर प्रांताध्यक्ष कोणाकडे द्यायचे आणि कोणाची काय जबाबदारी असेल, यावरही सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शेवटची निर्णायक बैठक बारामती येथे झाली, जिथे स्वतः अजित दादा आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.”

दोन वर्षांपूर्वी कोणाचा दबाव होता?

“अजित दादांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे यांनी मीडियासमोर क्लिपिंग देऊन सांगितले होते की, बारामतीच्या बैठकीत विलीनीकरणाचा विषयच नव्हता, आम्हाला दादांनी काहीच सांगितले नव्हते. मग आज दोन वर्षांनंतर तटकरेंना उपरती कशी झाली? त्यावेळी कोणाच्या दबावाखाली तटकरे खोटे बोलत होते आणि दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे कोणी रोखले, याचे उत्तर तटकरेंनीच महाराष्ट्राला द्यावे.”

विलीनीकरणाची चर्चा शून्य; पण चांगल्या नेत्यांनी पक्षात यायचे असेल तर स्वागतच!

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या रुग्णालयातील भेटीनंतर सुरू झालेल्या विलीनीकरणाच्या चर्चांना देशमुख यांनी पूर्णविराम दिला. “प्रफुल्ल पटेल हे शरद पवार साहेबांची प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात विचारपूस करायला गेले असतील; आजारपणात भेटणे ही आपली संस्कृती आहे. मात्र आजच्या घडीला दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. 15 दिवसांपूर्वीच मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या बैठकीत शरद पवार साहेबांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, विलीनीकरणाचा कोणताही विषय नाही, आपला पक्ष मजबूत करा.”

इनकमिंगचे दरवाजे खुले

“पवार साहेबांनी हेही स्पष्ट केले आहे की, आमच्या पक्षात जर कोणाला वैयक्तिकरीत्या प्रवेश करायचा असेल, तर त्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि जनतेत प्रतिमा चांगली असलेल्या नेत्यांचे पक्षात नक्कीच स्वागत आहे. बाहेर गेलेले सर्व लोक परत आले तरी त्यांचे स्वागतच राहील; पण पक्षाचे विलीनीकरण होणार नाही.”

पंतप्रधान मोदींच्या फोनचा वेगळा अर्थ काढू नका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर बोलताना देशमुख म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करताना काही वेगळ्या सद्भावनेने विधान केले असेल. त्याचे भलते राजकीय अर्थ काढण्याची किंवा त्याचा संबंध विलीनीकरणाशी जोडण्याची अजिबात गरज नाही,” असे स्पष्ट करत देशमुख यांनी या चर्चांवर पडदा टाकला.

———————————————————–

हेही वाचा…

ब्रीच कँडीतील ‘ती’ 1 तास चर्चा: मोदींच्या फोनपाठोपाठ पटेल-सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठी; विलीनीकरणाच्या चर्चांना का आले पुन्हा उधाण? इनसाइड स्टोरी

ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल असतानाच, रुग्णालयाच्या दालनातून सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यापाठोपाठ आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शरद पवारांनी पटेल यांना ’11 तारखेनंतर भेटू’ असा दिलेला निरोप आणि दुसरीकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेले फोन, यामुळे या आजारपणाच्या सदिच्छा भेटींमागे ‘दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची’ किंवा नव्या राजकीय समीकरणांची स्क्रिप्ट शिजत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.