Headlines

Admin

वारंवार वीज खंडितमुळे ग्रामस्थ संतप्त:रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

प्रतिनिधी | खुलताबाद ऐन उन्हाळ्यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी दि.२७ महावितरण कार्यालयात धडक दिली. ग्रामस्थांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा रोष अधिकच उफाळून आला….

Read More

खत लिंकिंग बंद करा:वैजापुरात निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बंद

प्रतिनिधी | वैजापूर रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धत तात्काळ बंद करावी, या प्रमुख मागणीसह प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी वैजापूर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. खतांचा पुरवठा करताना कंपन्यांकडून दुकानदारांना लिंकिंग देण्यात येत असल्याने विक्रेत्यांना एमआरपी पेक्षा अधिक दराने…

Read More

समृद्धी महामार्गावर कार धडकून पाच जण जखमी:पोलिस ठाण्यात नोंद

वैजापूर | चालकाला डुलकी लागल्याने कार साइड पत्र्याला धडकून पाच जण जखमी झाले. हा अपघात समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडला. इटोली (ता. जिंतूर) येथील वारणकर कुटुंबीय शिर्डी येथे दर्शनासाठी कारने (एम एच २२ ए डब्ल्यू ३०१५) जात होते. ते रात्री एक वाजता घरून निघाले. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास…

Read More

जेव्हा इरफान खान दरोडेखोर बनले, टाचेला दुखापत झाली होती:लंगडत 'पान सिंह तोमर'चे शूटिंग करण्यासाठी पोहोचले, ॲक्शन ऐकून धावायला लागायचे

29 एप्रिल रोजी इरफान खान यांची 6 वी पुण्यतिथी ही केवळ एक तारीख नाही, तर आठवणींचा महापूर आहे – एका अशा कलाकाराची, ज्याने अभिनयाला सत्याप्रमाणे जगले. त्यांचे जीवन, भूमिका आणि प्रवास कोणत्याही फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हता. हा प्रवास रणजिता कौर यांनी त्यांच्या ‘अ स्टोरी दॅट रिफ्यूज्ड टू डाय’ या माहितीपटात जपला आहे, जो पान सिंह…

Read More

कृषी विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरू:लासूर स्टेशनला १००% प्रतिसाद

प्रतिनिधी | लासूर स्टेशन लासूर स्टेशनसह गंगापूर तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांच्या बेमुदत बंदला सोमवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली. जाचक अटींचा निषेध केला. २७ तारखेपासून बेमुदत बंदला पाठिंबा दिला. योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा दिला. माफदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनतर्फे राज्यभर हा बंद पुकारण्यात आला आहे. देशातील असोसिएशननेही…

Read More

संकटांची मालिका संपेना; हतबल शेतकऱ्यांची मोसंबी बागांवर कुऱ्हाड:मोसंबीवर रोगराईचा वाढला घाट, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची बिकट वाट

दत्तात्रय मुळे | ढोरकीन सतत हवामान बदल, अवकाळी पाऊस, पडलेले बाजारभाव, आटोक्यात न येणारी प्रचंड रोगराई, उन्हाच्या तीव्र झळा व पाण्याची कमतरता यामुळे पैठण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर मोसंबी बागेवर अखेर कुऱ्हाड चालवण्याची व जेसीबी यंत्राच्या साहाय्याने बागा उपटून फेकण्याची वेळ आली. अनेक शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या बागा प्रामुख्याने रोगराई आटोक्यात न आल्याने व पाण्याअभावी सुकू…

Read More

टाकळीत आयसीएम कॉलेजचे एनएसएस शिबिर:स्वच्छता, प्रभातफेरी, वृक्षारोपण

प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी येथे आयसीएम इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. सामाजिक उपक्रम राबवले. ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. नागरिकांनी सहकार्य केले. हे शिबिर दरवर्षी गावात घ्यावे, अशी मागणीही केली. पहिल्या दिवशी सामाजिक विषयांवरील जनजागृतीचे फलक घेऊन गावातून प्रभातफेरी काढली. स्वच्छ भारत, सुंदर भारत….

Read More

केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला निरोप:विद्यार्थ्यांच्या मनात आठवणी दाटून आल्या

प्रतिनिधी | शिल्लेगाव गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. शाळेचा शेवटचा वर्ग सातवी असल्याने विद्यार्थ्यांचा शाळेशी असलेला प्रवास एका टप्प्यावर थांबला. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरटं कधीही पुन्हा बांधता येईल, क्षितिजापलीकडे झेप घेण्याची…

Read More

कॉर्पोरेट जिहाद – दानिश शेखच्या मोबाइलमध्ये ‘क्राइम डिक्शनरी’:मोबाइल ‘फेस आयडी’ने उलगडणार गुपिते; तरुणींचे फोटो

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात धक्कादायक मानवी तस्करीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता असून संशयित आरोपी दानिश शेखच्या मोबाइलमुळे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि धर्मांतराच्या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे हाती लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कडेकोट डिजिटल सुरक्षेत असलेल्या या मोबाइलमधून अशा काही करामती बाहेर आल्या आहेत की तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. दानिश शेख याने मोबाइलला सुरक्षेचे अभेद्य…

Read More

भोंदू खरातचा फसवणुकीच्या 8व्या गुन्ह्यात एसआयटी घेणार ताबा; आज हजेरी:9 गुन्ह्यांचा फास; लैंगिक शोषणाच्या 7 गुन्ह्यांत आतापर्यंत 42 दिवस कोठडीत

लैंगिक शोषणाच्या सातव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने खरातला बुधवारी ( २९ एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले जाणार आहे. फसवणुकीच्या ८ व्या गुन्ह्यात खरातचा एसआयटी ताबा घेणार असल्याचे समजते. लॉजिस्टिक व्यवसायात प्रगतीसाठी परदेशात ‘अवतार पूजा’ व ‘परिसाची शक्ती’ देण्याचे आमिष दाखवत खरातने पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना २०१८ ते २०२५ दरम्यान, २१ देशांत पूजा…

Read More