![]()
लैंगिक शोषणाच्या सातव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने खरातला बुधवारी ( २९ एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले जाणार आहे. फसवणुकीच्या ८ व्या गुन्ह्यात खरातचा एसआयटी ताबा घेणार असल्याचे समजते. लॉजिस्टिक व्यवसायात प्रगतीसाठी परदेशात ‘अवतार पूजा’ व ‘परिसाची शक्ती’ देण्याचे आमिष दाखवत खरातने पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना २०१८ ते २०२५ दरम्यान, २१ देशांत पूजा करण्यास सांगत कोटींचा गंडा घातला. या गुन्ह्यात खरातला कोर्टात हजर केले जाणार आहे. इनसाइड स्टोरी – २० दिवसांत तपास संपवण्याचे आव्हान तपासात तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यात हॉटेल व्यावसायिक व डॉक्टरची एसआयटीने चौकशी केली. पथकाकडे २० दिवस आहेत. ६० दिवसांत ९ गुन्ह्यांचा अहवाल पूर्ण करायचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Source link
भोंदू खरातचा फसवणुकीच्या 8व्या गुन्ह्यात एसआयटी घेणार ताबा; आज हजेरी:9 गुन्ह्यांचा फास; लैंगिक शोषणाच्या 7 गुन्ह्यांत आतापर्यंत 42 दिवस कोठडीत