Headlines

समृद्धी महामार्गावर कार धडकून पाच जण जखमी:पोलिस ठाण्यात नोंद




वैजापूर | चालकाला डुलकी लागल्याने कार साइड पत्र्याला धडकून पाच जण जखमी झाले. हा अपघात समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडला. इटोली (ता. जिंतूर) येथील वारणकर कुटुंबीय शिर्डी येथे दर्शनासाठी कारने (एम एच २२ ए डब्ल्यू ३०१५) जात होते. ते रात्री एक वाजता घरून निघाले. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जांबरगाव शिवारात चालकाला झोप लागल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्यावर जाऊन धडकली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले. तसेच कारचे नुकसान झाले. चालक मनोज वारणकर (४५), सुकन्या वारणकर (१६), दिव्या वारणकर (७), अभिषेक वारणकर (२१), मनोहर वारणकर (२७) हे अपघातात जखमी झाले.या अपघाताची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *