Headlines

Admin

वंचित, विशेष मुलांसाठी 'मामाच्या गावची सफर' उपक्रम:सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद

वंचित आणि विशेष मुलांसाठी आयोजित ‘मामाच्या गावची सफर’ या अनोख्या उपक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि पुणेकरांच्या सहभागाने आयोजित या २७व्या वर्षाच्या उपक्रमात चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मामाच्या गावी पोहोचताच चिमुकल्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बँडच्या गजरात नाचत, रंगीबेरंगी टोप्या घालून मुलांनी उत्साह दाखवला. बग्गी, उंट आणि…

Read More

कात्रज घाटात एसटी-रिक्षाचा भीषण अपघात:रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, तीन प्रवासी गंभीर जखमी; चालक ताब्यात

कात्रज घाटातील बोगद्याजवळ गुरुवारी सायंकाळी एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:२५ वाजता आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेटहून विटा (सांगली) कडे जाणारी एसटी बस (क्रमांक MH 10 DT 2697) कात्रज…

Read More

अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न:आरोपीला अटक, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; तिवसा येथील घटना

तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी राजू भानुदास चव्हाण (वय ३७) याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसह घराच्या अंगणात झोपलेली असताना, आरोपी…

Read More

महिला आरक्षणाला भाजपचाच विरोध:विजय वडेट्टीवार यांची टीका, म्हणाले – काँग्रेसने महिलांना राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपालपदही दिले

अमरावती येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज, गुरुवारी भाजपवर निशाणा साधला. २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेले आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायद्यात रूपांतरित झालेले महिला आरक्षण विधेयक सरकार लागू का करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. वडेट्टीवार यांच्या मते, महिला आरक्षणावरून गदारोळ करणारा भाजप स्वतःच…

Read More

निसर्गचक्र राखणे मानवी जीवनासाठी महत्त्वाचे:उपवनसंरक्षक अर्जुना यांचे जलपात्र वितरण कार्यक्रमात प्रतिपादन, वॉर संस्थेचा पुढाकार

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी मानवी जीवन सुखकर आणि सुसह्य ठेवण्यासाठी निसर्गचक्र कायम राखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. पशु, पक्षी आणि जंगल या सर्व बाबींचे योग्य संतुलन राखणे ही काळाची गरज असून, मानवी जीवन या चक्राचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. हे चक्र राखण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले….

Read More

शासकीय कामकाज चौथ्या दिवशीही ठप्प:कर्मचारी जुनी पेन्शन व इतर मागण्यांवर ठाम, जीआरची मागणी

सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेला संप आज, गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच राहिला. यामुळे अमरावतीसह राज्यभरातील शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक महत्त्वाची कार्यालये कुलूपबंद असल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत. आंदोलनकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे की, त्यांना केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष शासन…

Read More

सरकारकडून केरोसीन देण्याची घोषणा, पण घाटलाडकीत पोहोचले नाही:सिलिंडरप्रमाणेच नागरिकांना करावी लागतेय प्रतीक्षा

राज्याच्या पुरवठा मंत्र्यांनी रेशन दुकानांमार्फत प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन (रॉकेल) देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा होऊनही अद्याप ग्रामीण भागात, विशेषतः घाटलाडकी येथे केरोसीनचा पुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता केरोसीनसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या जागतिक परिस्थितीमुळे देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. सिलिंडर बुकिंगमध्ये अडचणी येत…

Read More

संघरत्न सरोदे अमरावती जिल्हा परिषदचे नवे शिक्षणाधिकारी:सतीश मुगल यांच्याकडून स्वीकारला पदभार, नांदेडहून बदली

अमरावती जिल्हा परिषदेचे नवे शिक्षणाधिकारी म्हणून संघरत्न सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी अमरावतीत पदभार स्वीकारला. सरोदे यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. सरोदे यांच्या पदभार स्वीकारल्यामुळे मुगल हे आता उपशिक्षणाधिकारी या त्यांच्या मूळ पदावर कायम राहतील. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा शिक्षण विभागाचे अधीक्षक पंकज गुल्हाने…

Read More

भंडाऱ्यात आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला:लग्नावरून परतताना वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 महिलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू

लग्नसराईचे दिवस आनंदाचे असतात, पण याच आनंदावर विरझण घालणारी एक अतिशय दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या एका व्हॅनचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पवनी तालुक्यातील सौंदड गावाजवळ हा अपघात घडला. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण अड्याळ गावावर शोककळा…

Read More

22 वर्षीय भावेश वानखडेला पहिल्याच प्रयत्नात कॅगमध्ये नोकरी:प्रतिकूल परिस्थितीतून मिळवले यश, समाजकार्य महाविद्यालयाचा गौरव

मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथील रहिवासी भावेश वर्षा अनिल वानखडे यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्र सरकारच्या कॅग (कन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) संस्थेत लेखाधिकारी (अकाउंटंट) पदावर यश मिळवले आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी ही महत्त्वपूर्ण नोकरी मिळवून प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. भावेश यांचे वडील विटभट्टीवर काम करतात, तर आई सूतगिरणीत मजूर म्हणून कार्यरत…

Read More