गुलटेकडी येथील खलील रज्जुलाल शेख (वय ५६) यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृताची पत्नी सुलताना खलील शेख (रा. गुलटेकडी डायस प्लॉट, नुराणी मशिदीजवळ, पु
.
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादीनुसार, २०१५ पासून १५ जुलै २०२६ पर्यंत आरोपींनी स्टेरिंग व्यवसायातील आर्थिक व्यवहारांवरून खलील शेख व त्यांच्या पत्नीला सातत्याने धमक्या देणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
गुन्ह्यात विशाल केवतरी, सुनील अय्यर, त्यांचा मुलगा, रघु गोडा, सुनील बोरा, राजन सेठिया, हमीदभाई शेख व त्यांचा मुलगा, बाबासाहेब शेडगे व त्यांची पत्नी, माजी आमदार रवींद्र धंगेकर व त्यांची पत्नी, शाम कोळेकर तसेच शुभम नावाच्या व्यक्तीचा आरोपी म्हणून समावेश आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी बाबासाहेब शेडगे यांनी खलील शेख यांचे स्टेरिंगचे साहित्य जबरदस्तीने नेले होते. या सर्व प्रकारामुळे खलील शेख प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी आणि व्हिडीओ तयार करून संबंधित आरोपींना जबाबदार धरल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. त्यानंतर १५ जुलै रोजी त्यांनी राहत्या घरी सिलिंग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे करीत आहेत.
अटकेची कारवाई होणार?
या प्रकल्पामध्ये विविध कारणांमुळे स्थगिती आल्याने काम रेंगाळले होते. त्यामुळे बँकेचे कर्ज वेळेत फेडता न आल्याने खलील शेख अत्यंत विवंचनेत होते. अखेर त्यांनी आत्महत्या केली. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याखाली कायद्यात तब्बल १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याने, पोलीस आता सर्व १० आरोपींचा शोध घेत असून लवकरच अटकेची मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपली बाजू मांडताना हा संपूर्ण प्रकार राजकीय सूडबुद्धीचा असल्याचा आरोप केला आहे. “माझ्या पत्नीने २०२५ मध्येच या कंपनीच्या भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आमचे आणि खलील शेख यांचे कोणतेही थेट बोलणे झाले नव्हते. जे काही आर्थिक व्यवहार झाले, ते वैयक्तिक नसून कंपनीसोबत झाले आहेत आणि आम्ही कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहत नव्हतो. मी आमदार झाल्यामुळेच विरोधकांनी या प्रकल्पावर राजकीय आकसापोटी स्थगिती आणली. या स्थगितीमुळे प्रकल्प रखडला आणि सर्व भागीदार देशोधडीला लागले. आता गुन्हा दाखल झाला आहे, तर आम्ही कायद्याचा आदर करत न्यायालयात आमची बाजू खंबीरपणे मांडू,” असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
पुण्यात बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या:कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल; सुसाईड नोट, व्हिडिओत गंभीर आरोप

गुलटेकडी (डायस प्लॉट) परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुणे शहर आणि बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शेख यांनी आत्महत्येपूर्वी एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली असून, काही गंभीर आरोप करणारे व्हिडिओदेखील प्रसारित झाले आहेत. सविस्तर वाचा…