Headlines

अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न:आरोपीला अटक, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; तिवसा येथील घटना




तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी राजू भानुदास चव्हाण (वय ३७) याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसह घराच्या अंगणात झोपलेली असताना, आरोपी राजू चव्हाण याने घरात प्रवेश केला. त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीला जाग आल्याने तिने आरडाओरड केली. मुलीचा आवाज ऐकून तिचे कुटुंबीय जागे झाले. कुटुंबीय जागे झाल्याचे पाहून आरोपीने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी तिवसा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपी राजू चव्हाण याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तिवसा पोलिस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *