मध्यप्रदेशातील ज्वारीची स्थानिकांच्या नावावर विक्री:मोर्शीतील प्रकार, खरेदी-विक्री संघाच्या संचालकांनी केली चौकशीची मागणी
मोर्शी येथे ज्वारी खरेदीत मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून आणलेली ज्वारी स्थानिक शेतकऱ्यांच्या नावावर शासनाला विकली जात असून, त्यासाठी बोगस अर्ज भरले जात आहेत. मोर्शी तालुका शेतकी खरेदी-विक्री संघाच्या संचालकांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या व्यवहारामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता संघाचे संचालक बंडू साऊत, पंकज विधळे, मंगेश…