Headlines

Admin

नेवासे येथील उपनगराध्यक्षांच्या पतीचा मुख्याधिकाऱ्यावर कट्ट्याने गोळीबार:‘ट्रिगर’ अडकल्याने बचावले, हल्ल्याच्या 6 दिवसांनंतर गुन्हा दाखल

नेवासे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (सीओ) निखिल लक्ष्मण फराटे यांच्यावर उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांचे पती संजय लक्ष्मण सुखदान यांनी थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फराटे यांनी बेकायदा कामे करण्यास नकार दिल्याने हा जीवघेणा हल्ला केला. गोळीबार करताना कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने फराटे यांचे प्राण बचावले. फराटे यांनी या घटनेच्या तब्बल सहा दिवसांनंतर तोफखाना…

Read More

तापमान वाढीने राज्यात 900 मे.वॅ. वीज तुटवडा:वीजचोरी व थकबाकी असणाऱ्या भागांतच भारनियमन

राज्यात वाढलेल्या तापमानामुळे कूलर आणि एसीचा वापर वाढला असून विजेच्या मागणीने ३१ हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. महानिर्मिती, खासगी वीज कंपन्या आणि केंद्रीय वीज केंद्रांकडून वीज खरेदी करूनही ऐन सर्वाधिक मागणीच्या काळात (सायंकाळी) ९०० ते १ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, महावितरणला गेल्या तीन दिवसांपासून (१६ ते १८ एप्रिल) सायंकाळी ७ ते…

Read More

राज्यातील हवामानात मोठा बदल:सोलापूर, इंदापूर आणि परभणीत पावसाचा धुमाकूळ; विविध ठिकाणी विजा कोसळल्या

राज्यात हवामानाचा मोठा विरोधाभास पाहायला मिळत असून, एका बाजूला उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला सोलापूर, पंढरपूर, परभणी आणि इंदापूरसह अनेक भागांत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. वेगवान वादळी वारा आणि विजांच्या लखलखाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इंदापूर तालुक्यात रात्री पावणे…

Read More

रागदरबार:'दीदी तुझा सूर चुकला' असे लता मंगेशकरांना सांगणाऱ्या.. सगळ्याच जॉनरमध्ये गाणाऱ्या.. चिरतरुण स्वरांचा झंझावात- आशा भोसले

देह पंचतत्वात विलीन होतो, पण काही दैवी सूर अवकाशात कायमचे रेंगाळत राहतात. दूरवर, प्रदीर्घ काळासाठी आणि कधीकधी तर युगायुगांसाठी. ‘नया दौर’मधील तो साधेपणा, ‘तीसरी मंज़िल’मधील विद्युलतेसारखी चपळता, ‘हरे रामा हरे कृष्णा’मधील पाश्चात्य ढब, ‘उमराव जान’ची ती अवीट नजाकत, ‘इजाज़त’मधील व्याकुळ भावूकता आणि ‘रंगीला’मधील तो बेधुंद तारुण्यातला उत्साह… काळ बदलला, पिढ्यानपिढ्यांची परंपरा बदलली आणि पडद्यावरच्या नायिकांची…

Read More

56 इंचाची छाती अन् काँग्रेसची इतकी भीती?:महिला आरक्षणावरून केवळ नौटंकी; मणिपूरवर मौन का? नाना पटोलेंचा मोदींच्या भाषणावर सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. “५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते?” असा सवाल करत, मोदींनी आपल्या भाषणात १५० पेक्षा जास्त वेळा काँग्रेसचा उल्लेख करून आपली हतबलता दाखवून दिली आहे. महिला…

Read More

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण:8 पीडितांपैकी पहिली मुलगी आली समोर, नागपूरहून 250 किमी प्रवास करून नोंदवला 'SIT' समोर जबाब

अमरावती हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात अखेर एक मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. सामाजिक भीती आणि कलंकाची पर्वा न करता, नागपूरच्या एका १५ वर्षीय धाडसी मुलीने पुढे येत विशेष तपास पथकासमोर (SIT) आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात ओळख पटलेल्या ८ पीडितांपैकी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समोर येणारी ही पहिलीच पीडिता ठरली…

Read More

नाशिक TCS प्रकरणातील पीडितेची आपबीती:म्हणाली – आरोपीने लग्नाची गोष्ट लपवली, मला रिसॉर्टवर नेऊन बळजबरीने अत्याचार केला

नाशिक येथील टीसीएस कंपनीत घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक माहिती पुढे येत आहे. पीडितांपैकी एका तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने आपले लग्न झाल्याची गोष्ट लपवून तिच्याशी जबरदस्थीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. पीडितेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोपी व आपली ओळख 4 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले आहे. महाविद्यालयात एकत्र…

Read More

सरसंघचालकपदी महिलांना संधी देणार का?:विजय वडेट्टीवार यांचा सवाल; मोदींचे भाषण आचारसंहितेचे भंग करणारे असल्याचा आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपत महिलांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला. भाजपने जे विधेयक आणले त्यात अनुसूचित जाती, जमाती विशेषतः ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. मनुस्मृती मानणाऱ्या भाजपत महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते, असे ते म्हणालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा एखाद्या महिलेच्या हातात देणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी…

Read More

दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश-देवी शारदा विवाह सोहळा:गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार 'शारदेश मंगलम्' उत्साहात संपन्न

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार श्री गणेश आणि देवी शारदा यांचा ‘शारदेश मंगलम्’ विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसर सनई आणि मंगलाष्टकांच्या स्वरांनी निनादला होता. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला….

Read More

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाकडून लैंगिक अत्याचार:पीडितेने विष प्रश्न केल्याने खळबळ, आरोपीला अटक; भंडाऱ्यात संतापाची लाट

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण कृत्यामुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने…

Read More