अमरावतीत रोज 64 जणांना श्वानदंश:मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्र अद्यापही नाही
अमरावती जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सरासरी ६४ नागरिकांना श्वानदंश होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेकडून भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारणीला अद्याप गती मिळालेली नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण २३,३९९ नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार घेतले आहेत. ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयांमधील असून, खाजगी…