मोठी बातमी:शिवसेनेत मोठा बदल, आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपदाची संधी; 2003 साली बाळासाहेबांनी निर्माण केलेले पद पुन्हा चर्चेत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या पक्षात युवा नेते आदित्य ठाकरे यांना लवकरच महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती होण्याची शक्यता असून, यासंदर्भात पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, हे कार्याध्यक्ष पद…