Headlines

हिंगोलीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन:वसमतमध्ये 15 जयंती मंडळाच्या आयोजकांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




वसमत येथे मिरवणुकीच्या वेळी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून 15 जयंती मंडळाच्या आयोजकांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 15 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. वसमत शहरातील विविध प्रभागातील 15 जयंती मंडळाच्या आयोजकांनी मिरवणुकीसाठी पोलिस विभागाकडे परवानगी मागितली होती. यावेळी वसमत शहर पोलिसांनी काही अटींसह मिरवणुकीसाठी परवानगी दिली होती. यामध्ये प्रामुख्याने ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करू नये असे स्पष्ट नमुद करण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतरही 15 जयंती मंडळांनी वसमत शहरात मिरवणुका काढल्या होत्या. या मिरवणुकांसाठी डीजे लावण्यात आला होता. त्यामध्ये शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सत्यनारायण टॉकीज, अशोक नगर, झेंडा चौक, मामा चौक या भागात डीजेचा आवाज वाढवून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करण्यात आले. पोलिस विभागाने ध्वनी मर्यादेबाबत दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी जमादार विनोद दळवी यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिजीत आरवीकर (फुलेनगर), रोहन राऊत (पंचशीलनगर), राजेश अटकोरे (अशोकनगर), अनिल आझादे (सिध्दार्थनगर), मोहन एरंडे (रेल्वेस्टेशन), सिध्दार्थ दातार, अभय कांबळे (शुक्रवारपेठ), रुपेश वाहुळे (लिंबोनी नगर), नागेश कांबळे (गौतम नगर), संदेश सुर्यवंशी (फुलेनगर), राहुल धायजेल (हर्षनगर), सुमील खंदारे (सम्राट कॉलनी), सागर कोल्हे (नागसेननगर), अनंता उबारे, सचिन इंगोले (पूर्णा वसाहत, सर्व वसमत) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक प्रणिता ढोरे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार विनोद दळवी, काशीनाथ भोपे पुढील तपास करीत आहेत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *