भोंदू खरातच्या मालमत्तांची 2 गोण्या कागदपत्रे जप्त:ईडीचा फास, अधिकाऱ्यांना नाेटिसा, स्वतंत्र चाैकशीही
भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात गुन्ह्यांची मालिका सुरूच असून मंगळवारी त्याच्या पोलिस कोठडीत चौथ्यांदा वाढ झालेली असतानाच आता या बहुचर्चित प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) एन्ट्री झाली आहे. ‘ईडी’ च्या विशेष १३ सदस्यीय पथकाने खरातचे नाशिकमधील निवासस्थान, सिन्नर (मिरगाव) येथील कार्यालये आणि पुण्यातील त्याच्या सीएच्या (सनदी लेखापाल) ठिकाणांवर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस छापे टाकले आहेत….