गहू खरेदीसाठी तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी:व्यापारी कमी दराने गहू करतात खरेदी, तहसीलदारांना दिले निवेदन
गहू पिकासाठी शासनाच्या हमी भावाने खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे बाजार समितीच्यावतीने तहसील डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात १८,७८६ हेक्टरवर गव्हाचे क्षेत्र असू . परंतु मागील महिन्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात गहु पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाजारात गव्हाचे दर शासनाने जाहीर…