![]()
विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. महायुतीचा उमेदवार मीच असेल, असा दावा आमदार सतीश चव्हाण यांनी रविवारी (१९ जुलै)येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडूनही पदव
.
आमदार चव्हाण यांची मुदतडिसेंबर महिन्याच्या पहिल्याआठवड्यात संपणार आहे. त्यामुळेऑक्टोबर महिन्यापासून पदवीधरमतदारसंघातील निवडणुकीचेवेळापत्रक घोषित होण्याची शक्यताआहे. आमदार चव्हाण म्हणाले की,आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिकनोंदणी झाली आहे. नोंदणी करतानाकाही अडचणी येत आहेत.त्याबाबत विभागीय आयुक्तांसोबतमी भेट घेऊन या समस्या मांडणारआहे. पक्षाकडून माझ्याच नावालापसंती असून, सर्वेक्षणात माझेच नावआघाडीवर आहे. पक्षानेनिवडणुकीची तयारी सुरू केलीआहे. महायुतीतील इतर पक्ष देखीलतयारी करत असल्याबाबत विचारलेअसता, प्रत्येक पक्ष निवडणुकीसाठीतयारी करतो. मात्र, ही जागा आमचीअसल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या पदवीधरमतदारसंघाची निवडणूक पुढीलवर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षितआहे. आमदार चव्हाण यांनी तीनवेळा या मतदारसंघात विजयमिळवला आहे. भाजपचे श्रीकांतजोशी यांचा पराभव करून चव्हाणयांनी या मतदारसंघात पहिलीनिवडणूक जिंकली होती.
तयारी पूर्ण, पण लढण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील- केणेकर
भाजपकडून माजी आमदार संजय केणेकर यांना नोंदणी प्रमुख करण्यात आले आहे. याबाबत केणेकर यांनी सांगितले की, आम्ही भाजप जिंकून येईल एवढी नोंदणी केली आहे. त्यामुळे जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली, असे काही नाही.भाजप ही जागा लढवणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा देखील भाजप जिंकले आहे. ही जागा देखील भाजपच जिंकेल. हा मतदारसंघ अन्य कोणत्या पक्षासाठी सोडायचा असेल, तर त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.