Headlines

संभाजीनगरच्या दोन भावांचा जामखेडला अपघातात मृत्यू:दोन्ही वाहनांचा अक्षरशः झाला चुराडा




जामखेड-कर्जत रोडवरील पाटोदा गरडाचे गावाजवळील धोकादायक वळणावर रविवारी (१९ जुलै) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास चारचाकी गाडी आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात श्रीगोंदे येथे शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दोन चुलतभावांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. निखिल मोतीलाल बहुरे (श्रीगोंदा तहसील कार्यालयात महसूल सहायक) आणि रामचंद्र महाजन बहुरे (श्रीगोंदा पाटबंधारे विभागात मोजणीदार) अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी होते. दोन्ही भाऊ कारने (एमएच २० जीई ३५६२) संभाजीनगरहून श्रीगोंद्याकडे नोकरीच्या ठिकाणी चालले होते. याच वेळी समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच १४ बीजे २२९३) कारला धडक दिली. या परिसरात रस्त्याला भेगा पडल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते, ज्यामुळे एका बाजूचा रस्ता बंद करून वाहतूक एकाच लेनवरून सुरू होती. याचदरम्यान दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *