Headlines

पाकिस्तानशी चर्चा, वांगचुकांशी का नाही- ठाकरे:मुंबईमध्ये उबाठा पक्षाकडून आंदोलन, दिपके यांचे हजारो समर्थक उतरले रस्त्यावर




लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाविरोधातील दडपशाही आणि “नीट’ परीक्षेतील देशव्यापी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ठाकरे पिता-पुत्रांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. पोलिस आणि शिवसैनिकांमधील तीव्र बाचाबाचीनंतरही सर्व अडथळे झुगारत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाहीरपणे घेरले. उद्धव ठाकरे यांनी थेट पहिल्याच वाक्यात संघप्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले, “अहो भागवत साहेब, हम हिटलर जैसे नहीं है’ हे तुमच्या मोदींना सांगा. पाकिस्तानबरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचुक यांच्याबरोबर का नाही करत? मोदी सरकारला सांगतो की, तुम्ही चादरीने वांगचुकांना जरी झाकलं असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. कितीही झाका, तुमचा पापाचा कोंबडा ओरडणारच आहे. हा लढा केवळ शिक्षणमंत्र्यांविरोधात नसून रोजीरोटी आणि शिक्षण हिरावून घेणारे हे दळभद्री सरकार बदलण्याचा आहे.’ उद्धव ठाकरेंचे भाषण संपल्यानंतर शिवसैनिक पांगले तरीही सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांचे हजारो समर्थक मैदानावर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर ठाण मांडून आक्रमक पवित्रा घेत होते. … म्हणूनच रुग्णालयात हलवले- श्रीकांत शिंदे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, सोनम वांगचुक यांना उपोषण करून २० दिवस झाले होते. उपोषण करत असताना त्यांच्या जिवाला काही बरे-वाईट झाले असते तर त्याला कोण जबाबदार असतं? म्हणूनच त्यांना रुग्णालयात दाखल केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *