संगमनेरशहराच्या विकासाचा १०० दिवसांच्या कामांचा लेखाजोखा:महिला सुरक्षा दल ठरले राज्यासाठी मॉडेल; तक्रार निवारण ॲपद्वारे ३१७ प्रश्न मार्गी
प्रतिनिधी |संगमनेर नगरपरिषदेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत नक्की काय बदल झाले? याचा लेखाजोखा सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. ‘संगमनेर २.०’ या संकल्पनेतून शहराचा शाश्वत विकास करतानाच, प्रशासकीय मरगळ झटकून ३९ विभागनिहाय बैठकांद्वारे कामांना गती देण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर…