Headlines

Admin

रामदासांच्या नव्हे, मग कोणाच्या भेटीमुळे शिवरायांमध्ये निर्माण झाले वैराग्य:शिवाजी महाराज कसे वळले स्वराज्याकडे?; जिजाऊंचे प्रयत्न ते तुकारामांची भेट, वाचाच…!

‘छत्रपती वीर शिवाजी महाराज युद्ध करून थकले. एकेदिवशी ते स्वामी समर्थ रामदासांकडे गेले. त्यांनी आपला मुकुट उतरवला आणि म्हणाले, आम्ही खूप लढाया लढल्या. आता आम्हाला पुन्हा लढायचे नाही. एक मोठी दया करा. हा मुकुट तुम्ही सांभाळा. राजपद तुम्ही सांभाळा. तुमच्या आज्ञेवरच आम्ही चाललो. आता आम्हाला पुढे चालवत नाही. आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आम्ही…

Read More

बागेश्वर बाबांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका:दुसरीकडे- उद्धव ठाकरेंच्या भेटीचे वृत्त फेटाळले, म्हणाले- लपून भेटण्याची गरज नाही

नागपूरमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. या कथनामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट…

Read More

हा भोंदू महाराष्ट्रात दिसता कामा नये:आमदार रोहित पवार संतापले; 'भोंदू बागेश्वर' म्हणत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा उल्लेख ‘भोंदू’ असा करत त्यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली आहे. शिवराय थकले व राजपाट समर्थांकडे दिला हे भोंदू बागेश्वर यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. ते पुन्हा महाराष्ट्रात दिसता कामा नये. त्यांच्यावर राज्यात बंदी घातली पाहिजे, असे ते आपला संतप्त…

Read More

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी राज्यसभेत नोटीस:73 खासदारांच्या स्वाक्षऱ्या, मार्चमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये फेटाळला गेला प्रस्ताव

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी शुक्रवारी राज्यसभेत नोटीस दिली. यावर 73 खासदारांच्या सह्या आहेत. CEC यांच्या विरोधात नवीन आरोपांमध्ये निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू करण्यात सतत पक्षपाती भूमिका घेणे आणि 18 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणाविरोधातील तक्रारींवर कारवाई न करणे याचाही समावेश आहे. वृत्तसंस्था…

Read More

रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का?:1672 पूर्वी दोघांच्या भेटीचे पुरावे नाहीत, पण एका पत्रात राजे भेटीस येत असल्याचा उल्लेख

बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सततच्या युद्धामुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडे आपला राजपाठ सोपवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा रामदास स्वामी हे खरेच शिवाजी महाराजांचे गुरू होते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काही इतिहासकार या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ अशी मान डोलावून देतात, तर काही ठामपणे…

Read More

पुण्यात आता तंत्रज्ञानाधारित शेतीचे धडे:20 गुंठे जागेत साकारला मॉडेल कृषी प्रकल्प, ॲग्रीकल्चर ट्रस्ट, रोबोटिक्ससोबत सामंजस्य करार

युवकांचे मातीशी नाते कायम राहावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत क्रांती घडवता यावी, या उद्देशाने विद्यार्थी सहायक समितीने पुढाकार घेतला आहे. समितीच्या संकुलात तंत्रज्ञानाधारित कृषी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले असून, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि डिजिटेक रोबोटिक्स इंजिनिअरिंग यांच्याशी दोन विशेष सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या करारांमधून कृषी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून…

Read More

पुण्यात 'लिंगभाव समावेशन अन् कौशल्य विकास' युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन:महिलांना उदयोन्मुख तंत्रज्ञानात आघाडीवर ठेवणे हेच उद्दिष्ट- केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते पुणे येथे ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन करण्यात आले. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) येथे आयोजित ‘विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा हा एक भाग होता. या उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या महिला…

Read More

ज्या सलीमचा गळा चिरण्यात आला, तो खुनी निघाला:जन्मठेप झाली होती, 26 वर्षांपासून फरार होता; त्याच्यावर हल्ला करणारे एन्काउंटरमध्ये ठार

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील ज्या एक्स मुस्लिम यूट्यूबर सलीम वास्तिकचा गळा चिरण्यात आला होता, त्याच्याबद्दल एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तो दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या 13 वर्षांच्या मुलाचा मारेकरी निघाला. दिल्ली पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली. तो 26 वर्षांपासून फरार होता. गाझियाबादचे पोलीस आयुक्त जे. रविंद्र गौड यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांचे पथक शनिवारी सकाळी…

Read More

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई:मंचर ते जुन्नरपर्यंत धुमाकूळ घालणाऱ्या दोन टोळ्या गजाआड, 23 गुन्हे उघड, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त!

पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोडी, चैन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत टोळ्यांतील गुन्हेगारांना अटक करून एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत 20 तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि गॅस सिलेंडरसह 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंचर आणि आसपासच्या परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या तपासादरम्यान, स्थानिक…

Read More

मुख्यमंत्र्यांनी किती लपूनछपून भेटी घेतल्या हे सर्वश्रूत:नोटीस पाठवा, मग बघू, 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचे मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर

प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने 22 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देत प्रबुद्ध भारतवर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यावर संपादक जीतरत्न पटाईत यांनी मुख्यमंत्र्यांकडून पाठवण्यात येणाऱ्या संभाव्य नोटीसीला योग्य ते प्रत्युत्तर…

Read More