रितेश-जिनेलिया बनणार STचे नवे चेहरे:ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड; स्टार जोडीकडून ब्रॅण्डिंगचा नवा अध्याय, लवकरच अधिकृत करार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लालपरी आता नव्या रुपात प्रवाशांसमोर येणार आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक बनवणे आणि नव्या पिढीला या सेवेकडे आकर्षित करणे, हा या निर्णयामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात…