Headlines

कसमादे बाजार परवाना रद्दच्या आदेशाला स्थगिती‎:पणन मंत्र्यांकडे अपील, खासगी बाजारातील शेतमाल लिलाव प्रक्रिया नियमितपणे सुरू‎



ढोलबारे येथील खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजाराचा परवाना रद्द करण्याच्या पणन संचालकांच्या आदेशाला पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पणन विभागाने हा आदेश जारी केल्याने कसमादे बाजाराला दिलासा मिळाला आ

.

खासगी बाजारासाठी नियमानुसार पाच एकर जागा स्वमालकीची अथवा ३० वर्षांच्या भाडेकरारावर असणे आवश्यक आहे. बाजाराच्या वतीने तत्कालीन पणन मंत्री व पणन संचालकांकडे नोटराइज्ड भाडेकरारासह आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मात्र, नोटराइज्ड भाडेकराराच्या जागेवर बाजार सुरू असल्याने तसेच मुदतीत नोंदणीकृत भाडेपट्टा व अन्य आवश्यक पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत पणन संचालकांनी परवाना रद्द केला होता.

या निर्णयाविरोधात कसमादे बाजाराने पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊनही निर्णय जाहीर होत नसल्याने बाजाराच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. दाखल रिट याचिकेवर २५ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने आदेश देत पणन विभागाला २८ ऑगस्टपूर्वी निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

कसमादे कृषी बाजारातील लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी दोधा गोयकर व कार्य समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे यांच्या हस्ते प्रवेशद्वारावर श्रीफळ वाढविण्यात आले. सभापती सुरेश पवार, सचिव गणेश पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल बच्छाव यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर गुलाल उधळून शेतकरी व व्यापाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शेतकरी कार्य समितीचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *