Headlines

तिसऱ्या श्रावणी सोमवारी गोरक्षनाथ गडावर भाविकांची अलोट गर्दी:गोरक्षनाथ गडावर भक्तिमय वातावरण; विद्यूत रोषणाई अन् फुलांची सजावट‎



शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेला श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड हे निसर्गरम्य वातावरणासोबतच अध्यात्मिकतेचे केंद्रबिंदू म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. श्रावणी तिसऱ्या सोमवारनिमित्त गोरक्षनाथ गडावर राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली

.

अहिल्यानगर शहरापासून जवळ असल्यामुळे तसेच निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणामुळे श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर वर्षभर भाविकांची वर्दळ असते. श्रावण महिन्यात विशेषतः भाविक मोठ्या श्रद्धेने गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी देवस्थानच्या माध्यमातून आवश्यक नियोजन करण्यात आले. याबाबत देवस्थानचे सचिव गोरक्षनाथ कदम म्हणाले, श्रावणी तिसऱ्या सोमवारनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडाचे दर्शन घेतले. राज्यभरातून आलेल्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टच्यावतीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने गोरक्षनाथ गडावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

श्रावण महिन्यात जमते भाविकांची मांदियाळी अहिल्यानगर शहराच्या जवळ असल्याने तसेच गडावरील निसर्गरम्य आणि शांत अध्यात्मिक वातावरणामुळे या ठिकाणी वर्षभर भाविकांची वर्दळ असते. मात्र, श्रावण महिन्यात गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्यावतीने नियोजन करण्यात आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *