![]()
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या किल्ले राजगडाच्या संवर्धनासाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून रविवारी (३० ऑगस्ट) दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. संघटनेची ही १७ वी
.
रविवारी भल्या पहाटे खासदार लंके यांच्यासह मावळे राजगडाच्या पायथ्याशी दाखल झाले. त्यानंतर श्रमदानातून गडावरील कचरा संकलन, स्वच्छता, डागडुजी, दगड-दुरुस्ती, नामफलक लावणे आदी विविध कामे करण्यात आली. स्वयंसेवकांनी उत्साहाने श्रमदान करत गडाचा परिसर स्वच्छ केला.
राजगडावर पर्यटक व शिवप्रेमींसाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याबद्दल खासदार लंके यांनी खंत व्यक्त केली. गडाकडे जाणारा रस्ता पुरेसा व सुस्थितीत नसणे, महिलांसाठी शौचालयांची सुविधा नसणे तसेच अन्य मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ‘गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याबरोबरच येथे येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सुविधा मिळणेही गरजेचे आहे,’ अशी भूमिका लंके यांनी मांडली.
राजगडाच्या विकासासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ‘आपला मावळा’च्या माध्यमातून यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर स्वच्छता, दुर्गसंवर्धन आणि जतनाच्या मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. राजगडावरील मोहिमेत सहभागी झालेल्या मावळ्यांनी इतिहासाचा हा वारसा जपण्यासाठी श्रमदान केले. राजगड २६ वर्षे स्वराज्याची राजधानी राजगड तब्बल २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा हा किल्ला साक्षीदार आहे. त्यामुळे राजगड हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून स्वराज्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा ठेवा मानला जातो, असे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.