![]()
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उत्सवाचे नियोजन, सार्वजनिक सुविधा आणि विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेत सोमवार ३१ रोजी महत्त्वपूर्ण बैठक झाली. मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गणेश मंडळांना मंडप परवानगी देण्यापासून ते विसर्जनाची व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनापर्यंत विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने यंदा तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश मंडळ नोंदणी तसेच मंडप परवानगीची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांनी गणेश मंडळ नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा सुरू करण्याचेही निर्देश दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी से. दे. पाटील, जितेंद्र पुरते, डॉ. प्रियश्री देशमुख, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भूषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, मनोज शहाळे, श्रीकांत सिंह चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे, बाजार व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश कडू, उदय चव्हाण, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे, मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे, अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, कार्यालय अधीक्षक गुलशन मिरानी, उपअभियंता शरद तिनखेडे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. विसर्जन व्यवस्थेवर भर गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या गणेश विसर्जनाच्या व्यवस्थेबाबतही बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पुरेशी आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. दरवर्षीप्रमाणे प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांनी या बैठकीत दिली. नियोजनपूर्वक काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
Source link
गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी प्रक्रिया ऑनलाइन:आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली महत्त्वपूर्ण बैठक