Headlines

Admin

धर्मांतर प्रकरणावर नाशिक पेटलं:रणरणत्या उन्हात महिलांची आक्रमक बाईक रॅली; नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा एल्गार

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील वातावरण तापलेले असतानाच आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत मोठी बाईक रॅली काढली. या रॅलीत शेकडो महिला, तरुणी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तापमान 38 ते 39 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असतानाही आंदोलकांनी उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर…

Read More

SCत निवडणुकांत मतदान सक्तीचे करण्याची मागणी:याचिका फेटाळली; CJI म्हणाले- जागरूकतेची गरज, आम्ही कोणालाही सक्ती करू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी देशात मतदान अनिवार्य करण्याच्या मागणीवरील याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, असा आदेश धोरणात्मक कक्षेत येतो आणि न्यायपालिका तो जारी करू शकत नाही. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने म्हटले की, जाणूनबुजून मतदान न करणाऱ्यांसाठी दंडात्मक कारवाईची मागणी करणाऱ्या आणि मतदान अनिवार्य करण्याच्या…

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर मोठा निर्णय:आरोग्य विभागाची नवी पॉलिसी जाहीर; बदल्यांसाठी नवे कडक नियम लागू

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे. या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या धोरणामुळे बदल्यांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः गट-ब, गट-क आणि गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी हे सर्वसमावेशक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बदल्यांबाबत…

Read More

'धुरंधर'मध्ये रहमान डकैतची भूमिका तुम्ही करायला पाहिजे होती:शत्रुघ्न सिन्हा यांनी गुलशन ग्रोवर यांना म्हटले, अभिनेत्याने सहमती दर्शवली

अभिनेता गुलशन ग्रोवर यांनी सांगितले की, अलीकडेच शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांना सांगितले होते की, ‘धुरंधर’ चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेली रहमान डकैतची भूमिका त्यांनी करायला पाहिजे होती. खरं तर, गुलशन ग्रोवर सध्या त्यांच्या आगामी ‘मटका किंग’ या वेब सीरिजचे प्रमोशन करत आहेत. याच दरम्यान त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जुन्या ट्रेंड्सच्या पुनरागमनावर भाष्य केले. ‘इंडिया टुडे’शी बोलताना ग्रोवर म्हणाले…

Read More

शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश:सरकारचा मोठा निर्णय, जड गोण्या बंद

राज्यातील माथाडी कामगारांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कांदा, बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक ठिकाणी जड गोण्यांची चढउतार करताना कामगारांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात…

Read More

यूट्यूब ॲपमधून 'शॉर्ट्स' पूर्णपणे हटवता येतील:वेळेच्या व्यवस्थापनात नवीन 0 मिनिटांचा पर्याय उपलब्ध झाला; रीलचे व्यसन सोडवण्यासाठी मदत मिळेल

यूट्यूबने ‘टाइम मॅनेजमेंट’चे नवीन फीचर जारी केले आहे. याच्या मदतीने आता तुम्ही ॲपवर शॉर्ट्स पाहण्याची वेळ मर्यादा ‘शून्य’ वर सेट करू शकता. यामुळे शॉर्ट्स फीड पूर्णपणे काढून टाकली जाईल. याचा उद्देश स्क्रीन टाइम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत करणे हा आहे. यूट्यूबने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शॉर्ट्ससाठी टाइमर फीचर सादर केले होते, ज्यामध्ये किमान वेळ…

Read More

मालाडचा भोंदूबाबा रिदम पांचाळ गजाआड:पालिकेच्या उद्यानात मांडला होता 'भूत' उतरवण्याचा खेळ, दोन आठवड्यांच्या पाठपुराव्यानंतर कारवाई

अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या एका भोंदूबाबाला मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. रिदम पांचाळ असे या भोंदूबाबाचे नाव असून, गेल्या अनेक दिवसांपासून मालाड परिसरात ‘भूत उतरवण्याच्या’ नावाखाली त्याचे अघोरी प्रकार सुरू होते. स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रिदम पांचाळ हा गेल्या दोन वर्षांपासून मालाडमध्ये दर गुरुवार आणि रविवारी अघोरी पूजेचे…

Read More

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मेला मतदान त्याच दिवशी निकालही:महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राजकीय गणित तापलं

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून 12 मे 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार असल्याने एका दिवसातच या निवडणुकीचा फैसला होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ…

Read More

स्वत:चा मतदारसंघ नसलेल्यांनी मतदारसंघाच्या पुनर्रचनेवर बोलू नये:उत्तर विरुद्ध दक्षिण वाद निर्माण करून देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न थांबवा- नवनाथ बन

उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कधी मनपाची सुद्धा निवडणूक लढले नाही त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या बोलताना मतदारसंघ असे फोडले जातील तसे फोडले जातील असे सांगू नये. राऊत यांना स्वत:चा मतदारसंघ नाही. त्यामुळे तुम्ही मतदारसंघाची चिंता करू नका, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्या विधेयक मंजूर झाल्यावर सांगा, ठाकरे, काँग्रेस देशाचे शत्रू आहेत का?…

Read More

अवनीत कौरने प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर मौन सोडले:अभिनेत्री म्हणाली- वयानुसार लूकमध्ये नैसर्गिक बदल झाला आहे

अभिनेत्री अवनीत कौरने नुकतेच तिच्या दिसण्याबद्दल सुरू असलेल्या प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्सच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. तिने स्पष्ट केले की तिच्या दिसण्यातील बदल वयानुसार नैसर्गिकरित्या झाला आहे. विशेष म्हणजे, अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. वेळेनुसार तिच्या दिसण्यात आलेल्या बदलांबद्दल सोशल मीडियावर काही लोकांकडून बोटॉक्स किंवा प्लास्टिक सर्जरी…

Read More