महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसचा केंद्रावर राजकारणाचा आरोप:गोपाळ तिवारी म्हणाले – अंमलबजावणी 2029 पासूनच शक्य
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असताना, केंद्र सरकार सामाजिक समतेच्या ध्येयाला धक्का देणारे निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. तिवारी म्हणाले की, ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाद्वारे महिलांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण केले जात आहे. नरेंद्र मोदी सरकारने…