पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण:मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!
राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला. मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची ‘तळ्यातमळ्यात’ भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे…