वसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे हळदीच्या कारखान्यात पाणी टाकण्यासाठी विद्युतपंपला पाईप लावतांना विजेचा धक्का बसल्याने बिहार राज्यातील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 अकस्मात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजनगाव शिवारात असलेल्या हळदीवर प्रक्रिया करून पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर बिहार राज्यातील मजूर कामावर आहेत….