देहूत रोहित पवारांची कुटुंबासह संतसेवा:संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाच्या कळसासाठी 11 किलो चांदी अर्पण, शेतकरी कर्जमाफीच्या लढ्याचाही केला उल्लेख
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब संत तुकाराम महाराजांच्या पावन नगरी देहूला भेट देत पालखी सोहळ्याच्या सेवेत सहभाग नोंदवला. संत तुकाराम महाराजांच्या नवीन चांदीच्या पालखी रथाच्या कळसासाठी पवार कुटुंबाच्या वतीने 11 किलो चांदी अर्पण करण्यात आली. ही चांदी संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात देहू संस्थानकडे विधिवत सुपूर्द करण्यात…