Headlines

Admin

Cameo Media Labs Pune Restores Ritwik Ghatak Films for Italy Fest

पुणेस्थित कॅमिओ मीडिया लॅब्सने दिग्गज चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या सहा क्लासिक चित्रपटांचे ध्वनी पुनर्संचयन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. हे पुनर्संचयित चित्रपट इटलीतील बोलोन्या येथे २० जूनपासून सुरू झालेल्या जागतिक कीर्तीच्या ‘इल सिनेमा रित्रोवा . पुनर्संचयित आणि अभिलेखीय चित्रपटांसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या महोत्सवात नऊ दिवसांत १३ प्रदर्शनांद्वारे हे चित्रपट सादर…

Read More

पुण्याच्या धरणांतील पाणीसाठा 24.30 टक्क्यांवर, कपात सुरू:फायर टँकमधील 'डेड स्टॉक' वापरा, जयंत इनामदार यांची मागणी

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा केवळ २४.३० टक्क्यांवर आल्याने शहरात पाणी कपात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील विविध इमारतींमध्ये असलेल्या अग्निशमन टाक्यांमधील (फायर टँक) ‘डेड स्टॉक’ पाणी वापरण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांनी केली आहे. इनामदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, धरणांमध्ये अत्यल्प साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने…

Read More

पुनीत बालन यांची भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्षपदी निवड:2026-30 कार्यकारिणीत 22 पदाधिकाऱ्यांचा समावेश

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या (एकेएफआय) अध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची बिनविरोध निवड झाली आहे. २०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या या नव्या कार्यकारिणीत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली असून, एकूण २२ पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक रांची (झारखंड) येथे पार पडली. या निवडणुकीसाठी महासंघाचे २२ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राचे क्रीडा…

Read More

Mission 2047 Terror Plan Revealed by ATS

फराज शेख। भोपाळ2 तासांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एटीएसच्या चौकशीत पकडल्या गेलेल्या कथित दहशतवादी मॉड्यूलबाबतच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. पोलीस रिमांडवर असलेल्या इजहार उल हकने एजन्सीला सांगितले की तो आणि पाकिस्तानी दहशतवादी गटाशी संबंधित इतर लोक ‘मिशन 2047’ साठी काम करत होते. या अंतर्गत, पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) चा अजेंडा…

Read More

दगडूशेठ ट्रस्टतर्फे 600 ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप:जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत कानाची तपासणी करून मदत

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे झालेल्या शिबीरात महाराष्ट्रातील तब्बल ६०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत हा उपक्रम सातत्याने सुरु असून महाराष्ट्राच्या विविध शहरांतून तसेच ग्रामीण भागातून हे ज्येष्ठ नागरिक शिबीरासाठी पुण्यात आले होते. पिनॅकल इंडस्ट्रीज, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती…

Read More

देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 जाहीर:कृती समितीची कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची राज्य सरकारकडे मागणी

गेल्या सहा ते सात दशकांपासून प्रलंबित असलेल्या देवस्थान इनाम जमीन धारकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ जाहीर केला आहे. या प्रारूप कायद्याला तात्पुरती स्थगिती देऊन अधिक व्यापक सुधारणांसाठी अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याबद्दल ‘देवस्थान जमीन इनाम वर्ग-३ कृती समितीने’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

पीएमपी चालकाला भररस्त्यात मारहाण:गाडी घासल्याच्या वादातून मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कोंढव्यातील येवलेवाडी भागात गाडी घासल्याच्या वादातून एका मोटार चालकाने पीएमपी चालकाला भररस्त्यात मारहाण केली. या प्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीएमपी चालक अशोक पांडुरंग पवार (वय ४०) यांनी याबाबत येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीएमपी बस सासवडकडे जात होती. येवलेवाडी परिसरात…

Read More

व्यावसायिकाच्या मुलांनी 7 पोलिसांना चिरडले:एका कॉन्स्टेबलचा पाय मोडला, हात-चेहऱ्यावर जखमा; मेरठमध्ये इनोव्हा-थारने शर्यत लावत होते

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ऑटो पार्ट्स व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 7 पोलिसांना चिरडले. यात एका कॉन्स्टेबलचा पाय मोडला. दोघांच्या हाताची त्वचा सोलवटली, तर इतरांच्या तोंडाला आणि नाकाला दुखापत झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोमवारी समोर आले. यात दिसत आहे की, शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी रस्त्याच्या कडेला…

Read More

सशस्त्र नक्षलवाद संपला, आता वैचारिक नक्षलवादाचे आव्हान:पुण्यातील परिसंवादात तज्ज्ञांनी मांडले विचार; गृहमंत्री शहांच्या पुस्तिकेचे प्रकाशन

देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका ठरलेला जंगलातील सशस्त्र नक्षलवाद सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे आता संपुष्टात आला आहे. मात्र, आता विमर्शाच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करणाऱ्या ‘वैचारिक आणि शहरी माओवादा’चे मोठे आव्हान उभे ठाकले आहे, असा सूर पुण्यात आयोजित ‘नक्षलवाद: संविधानविरोधी आव्हानाचा शेवट’ या परिसंवादात उमटला. एरंडवणे येथील सेवा भवनमध्ये हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये…

Read More

पुण्यात पाचशेची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न:चहा विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे दोघे अटकेत

पुणे: पाचशे रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. ढोले-पाटील रस्त्यावरील एका चहा विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे हे आरोपी पकडले गेले. न्यायालयाने त्यांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सिद्धराम अशोक बिदनकर (वय २५, रा. ताडीवाला रस्ता) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक केलेल्या आरोपींची…

Read More