'4 BIN HAR DIN' अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद:मनपा IEC टीमच्या मार्गदर्शनाखाली मानवी साखळीतून जनजागृती
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ‘4 BIN HAR DIN’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्त अमोल येडगे आणि उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. १८ मधील जागृती प्राथमिक शाळा, बन्सीलाल नगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मनपाच्या IEC (माहिती, शिक्षण आणि संवाद) टीमने विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन २०२६ च्या नवीन…