चांदवडकरांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा:नगराध्यक्ष वैभव बागूल यांचे नागरिकांना आवाहन
यंदा जून महिन्याचा मध्य उलटून गेला तरी मान्सूनने अपेक्षित गती घेतलेली नाही. तालुक्यात व चांदवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर, नागरिक व शेतकरी बांधवांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगराध्यक्ष वैभव बागूल यांनी केले आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने…