कुर्डुवाडीत मोकाट श्वानांचा हैदोस:ड्यूटीवर जाणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यावर हिंस्त्र हल्ला, रेल्वे जंक्शन बनले श्वानांचे आगार
रात्रपाळीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याला मोकाट श्वानांच्या टोळीने लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना कुर्डुवाडी रेल्वे स्थानक परिसरात घडली. श्वानांच्या अचानक झालेल्या हिंस्र हल्ल्यामुळे दुचाकीवरून कोसळून रेल्वेचे ट्रेन मॅनेजर प्रभाकर पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न कमालीचा ऐरणीवर आला असून, रेल्वे कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे….