Headlines

8.33 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेला राज्यात वेग




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (२०२६) अंतर्गत आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) अभियान राज्यभरात वेगाने सुरू आहे. ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत, राज्यातील एकूण १६,९६,२०१ लाभार्थींपैकी ८,३३,२२३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. ही प्रगती ४९.८४ टक्के इतकी नोंदवली गेली आहे. विभागनिहाय आढाव्यानुसार, अमरावती विभागात ५४.१५ टक्के, नाशिक विभागात ५४.९३ टक्के, पुणे विभागात ६०.२६ टक्के आणि कोल्हापूर विभागात ६४.२६ टक्के आधार प्रमाणीकरण झाले आहे. तर, नागपूर विभागात ४८.४८ टक्के, कोकण विभागात ४९.१५ टक्के, लातूर विभागात ३९.७७ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ३५.०६ टक्के प्रगती झाली आहे. जिल्हानिहाय प्रगतीमध्ये अहमदनगर (७३.४७ टक्के), भंडारा (६९.८९ टक्के), वाशीम (६७.४८ टक्के), ठाणे (६७.४२ टक्के), सांगली (६७.३४ टक्के), सातारा (६६.५८ टक्के), पुणे (६५.४४ टक्के) आणि नाशिक (६४.८६ टक्के) या जिल्ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. योजनेचा लाभ वेळेत मिळावा यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, संबंधित यंत्रणांना प्रलंबित लाभार्थ्यांशी संपर्क साधून हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी भरलेला गणना फॉर्म बीएलओकडे तातडीने जमा करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश मतदारांनी गणना फॉर्म भरून दिला आहे. मात्र, काही मतदारांनी भरलेले फॉर्म अद्यापही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे परत केलेले नाहीत. अशा सर्व मतदारांनी कोणताही विलंब न करता आपला भरलेला गणना फॉर्म संबंधित बीएलओकडे जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमानुसार प्राप्त होणाऱ्या गणना फॉर्मच्या आधारे मसुदा मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांनी गणना फॉर्म भरला असूनही तो अद्याप बीएलओकडे सुपूर्द केलेला नाही, त्यांनी तो तातडीने जमा करावा. वेळेत गणना फॉर्म जमा केल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुनिश्चित होईल. त्यामुळे कोणत्याही पात्र मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाही. नागरिकांनी या प्रक्रियेस सहकार्य करून भरलेले गणना फॉर्म त्वरित संबंधित बीएलओकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *