Headlines

Admin

पालखी मार्गावर वृक्षांचा 7 वा वाढदिवस:सेंद्रिय खताचा केक कापून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश‎

वृक्षांचे वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे. वृक्ष जगले तरच मानव जात जिवंत राहणार आहे. यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची मंगळवेढ्यातून वारी परिवाराने सुरू केलेली संकल्पना महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. वारी परिवार व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा-पंढरपूर हरित…

Read More

शिवराज्य सेनेतर्फे शिवरायांच्या पुतळ्यास पंचामृताने महाअभिषेक:तालुक्यातील विविध सामाजिक संघटना अन् राजकीय पक्षाकडून अभिवादन‎

शहर व तालुक्यात शिवप्रेमी संघटना व संस्थांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.येथील शिवराज्य सेनेच्यावतीने शिवभक्तांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. शिवाजी कॉलेज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ मूर्तीजवळ हा सोहळा झाला. यावेळी शिवराज्य सेनेच्या वतीने शिवरायांच्या मूर्तीला पंचामृताने महाअभिषेक घालण्यात आला. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थितांनी दिलेल्या “जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी संपूर्ण…

Read More

कवठा कडू आमसभेत गोंधळ; आरोपांनी तापले वातावरण:ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांवर भडीमार, उत्तरांअभावी संताप अनावर

तालुक्यातील कवठा कडू ग्रामपंचायतीच्या ५ जून रोजी आयोजित आमसभेत विविध विकासकामांतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत जाब विचारला. मात्र, अनेक प्रश्नांना स . ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात प्रत्यक्षात एकच सार्वजनिक शौचालय असताना ग्रामपंचायतीच्या नोंदीत तीन सार्वजनिक शौचालये दाखवल्याचा आरोप केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी मशीन खरेदीसाठी खर्च…

Read More

केरळममधील वर्कला जगातील 20 ‘झिरो वेस्ट सिटी’मध्ये:262 महिला पथके घरोघरी पोहोचली, लोकांच्या सवयी बदलल्या; 95% कचऱ्याचे पुनर्प्रबंधन

केरळममधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील किनारी आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर वर्कला आतापर्यंत अतुलनीय सौंदर्य, अरबी समुद्र, खडक, 2000 वर्षांपूर्वीचे जनार्दन स्वामी मंदिर आणि मशिदींसाठी प्रसिद्ध आहे. आता हे सुंदर शहर जगभरात ‘झिरो वेस्ट सिटी’ म्हणूनही ओळखले जात आहे. यूएन-हॅबिटॅट आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने जगातील 20 शहरी भागांमध्ये वर्कला नगरपालिकेला ‘झिरो वेस्ट सिटी’ म्हणून निवडले आहे. 20 शहरांमध्ये…

Read More

मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका:बच्चू कडूंचे मंत्र्यांसमोरच मोठे विधान, शिवसैनिकांना केले थेट आवाहान

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असतानाच, आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांना आगामी राजकीय स्थिती व संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन केले. मात्र याचवेळी भाषण करताना, मंत्री जर चुकत असेल तर त्याला ठोकल्याशिवाय…

Read More

चारित्र्यवान व व्यसनमुक्त पिढीच देशाची खरी संपत्ती- प्रमोद पोकळे:राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे सुसंस्कार शिबिराचा समारोप‎

‘मोबाइल, सोशल मीडियाच्या युगात तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनाधीनतेमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले असून, त्यांना वेळीच सुसंस्कारांचे बाळकडू देणे गरजेचे आहे. अशा शिबिरांमधून घडलेली सशक्त, व्यसनमुक्त चारित्र्यवान नवपिढीच भारताची खरी संपत्ती ठरेल,’ असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रमोद पोकळे यांनी केले. गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप…

Read More

Hingoli Police Lodge FIR: 19.99 Lakhs Turmeric Theft

हिंगोली शहरालगत लिंबाळा औद्योगिक वसाहतीमधून चोरट्यांनी गोदामाचे शटर वाकवून 19.99 लाख रुपये किंमतीचे 353 कट्टे हळदीचे पोते चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. 7 गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये स्टार ॲग्रोवेअर हाऊसिंग मॅनेजमेंट कंपनीचे गोदाम आहे. या ठिकाणी शेतकरी तसेच कंपनीचा…

Read More

अयोध्या राम मंदिरातून 7 कोटींच्या चोरीचा दावा:अखिलेश म्हणाले- सरकारचे मौन संशयास्पद; माजी मंत्री म्हणाले- चंपत राय यांनी शपथ घ्यावी

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचा आरोप आहे की, अयोध्या राम मंदिरात आलेल्या देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी झाली आहे. त्यांनी रविवारी दुपारी X पोस्ट लिहून म्हटले, सरकारचे मौन संशयास्पद आहे. न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची दखल घ्यावी. अयोध्येतील सपाचे माजी आमदार आणि मंत्री पवन पांडे यांनी दावा केला की, 5 ते 7.5 कोटी रुपयांपर्यंतची चोरी झाली आहे….

Read More

उपक्रम:जागतिक पर्यावरण दिनाला वनमजुरांचा सन्मान, वृक्षांना जपणे ही प्रत्येकाची जवाबदारी

‘बिजांपासून रोप तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वनाधिकारी अन् वनमजूर करत असून त्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा, यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताचे वनमजुरांचा सन्मान करण्यात आला. या वेळी गजानन कोल्हे यांनी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष रूपाली माथने यांनी, “ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे वृक्षांनाही…

Read More

कन्हान नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू:कामठी येथे सहलीचा दुर्दैवी शेवट, 6 वर्षांच्या बालकाचाही समावेश

नागपूरजवळील कामठी परिसरात कन्हान नदीच्या पात्रात रविवारी दुपारी एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा वर्षांच्या बालकाचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ६ वर्षीय चैतन्य बबलू अंबादे, ३१ वर्षीय गौतम राजकुमार अंबादे आणि ३३ वर्षीय रोहित कैलास नागदेवे यांचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या जरीपटका भागातील अंबादे आणि…

Read More