Headlines

Admin

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांची घोषणा:छगन भुजबळांऐवजी विदर्भाला दिली संधी; सुनील तटकरेंनी दिली माहिती

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून विधानसभेचे सदस्यत्व स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या या जागेवर राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेच्या बाबतीत बैठकीत…

Read More

अंनिसची संघर्ष फेरी:"प्रत्येक जण प्रयत्न करू.. भोंदू मुक्त गाव साकारू', बुवाबाजी व भोंदूगिरीविरोधात दिली घोषणांची साद‎

येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीचा दुसरा दिवस विविध उपक्रमांनी गाजला. शनिवारी सायंकाळी पाच वाजता बडी साजन मंगल कार्यालय ते कोठी रोड मार्गे बाजार समिती आणि तेथून जुने बसस्थानक मार्गे पुन्हा बडी साजन मंगल कार्यालयापर्यंत एक भव्य व ऐतिहासिक ‘विरोधी संघर्ष…

Read More

‘आनंद तीर्थ-समवशरण’ भूमीवर क्षेत्र विशुद्धी विधी:उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराजांच्या सान्निध्यात रंगणार सोहळा‎

महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी यांच्या सान्निध्यात, अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीण ऋषीजी यांचा २०२६ मध्ये होणारा ‘समर्पण – सर्व कल्याण’ शिखर चातुर्मास सोहळ्याच्या तयारीचा शुभारंभ आनंदधाम परिसरात करण्यात आला. चातुर्मासासाठी उभारण्यात येणार असलेल्या ‘आनंद तीर्थ-समवशरण’ या मुख्य प्रवचन स्थळाच्या भूमीवर जैन परंपरेनुसार ‘क्षेत्र विशुद्धी’ हा मंगल विधी उत्साहात व भाविक वातावरणात झाला. हा…

Read More

Aamir Khans Third Marriage at 61 Backed by Rakhi Gulzar

46 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता आमिर खान वयाच्या 61 व्या वर्षी तिसरे लग्न करणार आहेत. ते 5 जुलै रोजी त्यांची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्न करणार आहेत. आमिरच्या वाढत्या वयात लग्न करण्यावरून होणाऱ्या टीकेदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार आमिर खानच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. व्हरायटी इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत राखी म्हणाल्या की, वैवाहिक जीवनातील सुखाचा संबंध…

Read More

श्रीरामपूर-बेलापूर नव्या रस्त्यासाठी झाडांचा बळी:वृक्षप्रेमींमध्ये संताप, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन रोपांचीही राखरांगोळी

झाड आणि रस्ता यांचे नाते नेहमीच विळ्या-भोपळ्याचे राहिले आहे. अरुंद रस्ता, वाढती वाहतूक आणि अपघातांचे सत्र यामुळे श्रीरामपूर-बेलापूर राज्य मार्ग क्रमांक ३६ या ६ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करणे आवश्यक होते. मात्र, हा विकास साधताना वडाच्या झाडांसह इतर शेकडो जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली. वृक्षप्रेमींच्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाने रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकांमध्ये नवीन झाडे लावली ,…

Read More

छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अभियान राबवावे:जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे प्रतिपादन, पोवाड्यांनी जिंकली मने‎

अतिशय धाडसी सेनानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. आजच्या इतके आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही त्यांनी एक आदर्श आणि लोककल्याणकारी राज्यकारभार चालवून दाखवला. सर्वसामान्यांवर कदापि अन्याय होऊ नये, हीच त्यांची भूमिका असायची. कोणत्याही नागरिकाला प्रशासनाचा जाच होणार नाही, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याच संकल्पनेनुसार सध्या ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान…

Read More

पाथर्डीतील गोळीबाराची आपबीती सांगताहेत पोलिस अधिकारी:अक्कलकोटमधील सराफ लुटीच्या तपासासाठी पथक‎

एआय इमेज अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे एका सराफास लुटून १० लाखांचे दागिने लंपास केले होते. त्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अटक केलेल्या संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गुरुवारी पाथर्डी येथील खरबंडी गावात त्याच्या वस्तीपर्यंत गेलो होतो. रात्री १०.३७ वाजता आरोपीच्या जवळ गेलो. तो पाईपलाईनसाठी चर खोदत असल्याचे दिसून आले. तो गाफील असेल त्यास आम्ही ताब्यात घेऊ…

Read More

धोंड्याच्या महिन्यातच मेहुण्याने भाऊजीचा काढला काटा!:3 लाखांची दिली होती सुपारी, कवठेमहांकाळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार

सध्या सर्वत्र धोंड्याचा महिना साजरा होत असून, परंपरेनुसार गावोगावी जावयाचे आणि भाऊजींचे मोठ्या थाटात लाड केले जात आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे या परंपरेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विम्याच्या तब्बल 30 लाख रुपयांच्या रकमेवर डोळा ठेवून सख्ख्या मेहुण्यानेच आपल्या भाऊजींचा काटा काढला आहे. या खळबळजनक गुन्ह्यासाठी त्याने…

Read More

पालकमंत्र्यांनी विरोधकांना गोंजारले,‎मतांसाठी आघाडीतील नेत्यांच्या घरी‎:राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांच्याशी जेऊर येथे गुप्तगू‎

जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका एकमेव असा आहे, की नवे जुने भाजपचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. भाजप पक्षासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विश्वासू ,निष्ठावंत नेत्याची गरज होती. ती आता माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांनी काहीच मागितले नाही. परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये ते आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले तुम्हा सर्वांना दिसतील. त्याचबरोबर विधान…

Read More

मान्सून महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये पोहोचला:केरळम-तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, चेन्नईत पारा 40°C; एमपी-राजस्थानमध्ये 50 किमी प्रतितास वेगाने वादळ

रविवार रोजी मान्सून त्रिपुरा, नागालँड, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या आणखी चार राज्यांमध्ये पोहोचला. महाराष्ट्रात मान्सून केवळ दक्षिण कोकणापर्यंतच पुढे सरकला. यामुळे 9 जूनपर्यंत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र, पुढील आठवड्यापर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. आयएमडीनुसार, मान्सूनमुळे केरळम, कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र,…

Read More