‘नीट’चा पेपरलीक विरोधात एनएसयूआयचा मशाल मोर्चा:मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह ‘एनटीए’ बरखास्तीची केली मागणी
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ परीक्षा पेपर लीक घोटाळ्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का लावणाऱ्या गंभीर घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवारी ५ शहरात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निष्काळजीपणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सर्वप्रथम…