शर्तभंग प्रकरणांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे:नागरिकांना मंत्रालयात जाण्याची गरज नाही, निपटारा स्थानिक पातळीवर
राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता नियमांतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करत शर्तभंग प्रकरणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्याचे अधिकार आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. यापूर्वी हे अधिकार केवळ महसूल मंत्र्यांकडे होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयाची अधिसूचनाही जारी करण्यात आली…