Headlines

Admin

गोकुळ गितेंमुळे वाढली महायुतीची डोकेदुखी:जाहीर पाठींबा देण्यास स्पष्ट नकार; तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत, महाजन नाशकात

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गोकुळ गिते यांच्या बंडखोरीमुळे सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत नाशकात तळ ठोकून आहेत. हे दोन्ही नेते गोकुळ गिते यांचा जाहीर पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गोकुळ गिते यांनी निवडणूक खूप पुढे गेल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठींबा…

Read More

Kharif Seeds on Mahadbt Portal

राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर . महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाचा अभिनव उपक्रम राज्यात यंदा खरीप हंगाम प्रमाणित बियाणे व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध…

Read More

'मी सावित्रीबाई जोतिराव फुले' मालिका बंद होणार?:अमोल कोल्हेंचा सेटवरील व्हिडिओ व्हायरल; मानधनाबाबत मोठा निर्णय, 'व्यावसायिक गणिते' की 'राजकीय दबाव'? चर्चा सुरू

मराठी मनोरंजन विश्वातून सध्या एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ बंद होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. मालिकेचे निर्माते आणि मुख्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा सेटवरील एक अंतर्गत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना अधिकृत दुजोरा…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी दिग्गज मैदानात:उबाठाचे अंबादास दानवे यांनी भरला उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, जिल्ह्यातील दिग्गजांनी थेट निवडणूक मैदानात उडी घेतली आहे. या हायव्होल्टेज निवडणुकीसाठी उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनी संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, भाजप आणि महायुतीनेही या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. गुरुवारी (दि. 4) भाजपकडून राज्याचे…

Read More

राजस्थानमध्ये इबोला विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळला:युगांडाहून आलेल्या महिलेमध्ये या संसर्गासारखी लक्षणे, जयपूरच्या RUHS मध्ये दाखल

राजस्थानमध्ये इबोला विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. युगांडाहून राजस्थानला फिरायला आलेल्या महिलेमध्ये इबोला संसर्गासारखी लक्षणे आढळली आहेत. ही महिला जयपूरच्या राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस (RUHS) मध्ये दाखल आहे. रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अधिकार्यांचे म्हणणे आहे की, अहवाल येईपर्यंत सर्व खबरदारीचे उपाय सुरू राहतील. तपासणीसाठी…

Read More

संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला:विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भेट; भेट केवळ सौजन्याची की यामागे काही राजकीय रणनीती?

विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण तापले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही केवळ सौजन्यभेट होती की यामागे…

Read More

वर्ल्ड बँकेत भारताचे कार्यकारी संचालक बनले अर्थशास्त्रज्ञ नीलकंठ मिश्रा:3 वर्षांचा असेल कार्यकाळ, परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतील

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि मार्केट स्ट्रॅटेजिस्ट नीलकंठ मिश्रा यांची वर्ल्ड बँकेत भारताचे नवे कार्यकारी संचालक (ED) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. ते वॉशिंग्टन येथील वर्ल्ड बँकेच्या मुख्यालयात 3 वर्षांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करतील. मिश्रा सध्याचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतील. जोपर्यंत नीलकंठ मिश्रा आपला पदभार स्वीकारत…

Read More

अन्नामलाईंची भाजपला सोडचिट्ठी:तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते, नबीन यांनी राजीनामा मंजूर केला, नवा पक्ष स्थापन करू शकतात

तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी शुक्रवारी भाजप सोडला. त्यांनी भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी तो मंजूरही केला आहे. अन्नामलाई यांनी 3 दिवसांपूर्वी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. सूत्रांनुसार, अन्नामलाई यांना भाजपमधून कोणताही संघर्ष न करता सन्मानजनक निरोप हवा होता. यानंतर ते तामिळनाडूमध्ये ‘राष्ट्रवादी-तमिळ दर्शन’ आधारित बिगर-राजकीय…

Read More

राजकारणाचा चिखल करणाऱ्या नेत्यांचा माज आता जनतेनेच उतरवावा:गाड्या, पैसा असणाऱ्यांना अन् मित्रांनाच उमेदवारी- अमित ठाकरे

राजकारणाचा सध्या जो चिखल झाला आहे, त्याकडे आता जनतेने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राजकीय पक्ष ज्याला उमेदवारी देतील तो जिंकेलच, हा नेत्यांचा अवाजवी आत्मविश्वास लोकांनीच आता मोडून काढला पाहिजे. जनतेमुळेच आपण तिथे खुर्चीवर बसलो आहोत, याची जाणीव आता नेत्यांना करून देण्याची वेळ आली आहे, असे म्हणत मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र…

Read More

संजय राऊतांकडे घोडेबाजाराचे पुरावे आहेत का?:शंभूराज देसाईंचा सवाल; ठाकरे गटात शिंदेंना मानणारे अनेक नेते असल्याचा दावा

सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप जोरकसपणे फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांच्याकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचे काही पुरावे आहेत का? संजय राऊत नेहमीच अशी मोठमोठी विधाने करतात. पण त्यांचे काहीही खरे होत नाही. त्यांनी आपल्या सवयीनुसार मोठ्या रकमेचे आकडे सांगितले….

Read More