Headlines

Admin

विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार कोण?:परिचारक, पवारांच्या समर्थकांचे सोशल मीडियावर 'भावी आमदार'चे स्टेटस

बाजार समिती, जिल्हा परिषद व‎पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी ‎भाजपला तालुक्यात शत-प्रतिशत यश‎ मिळवून देत विधानसभेचा पराभव हा‎ एक राजकीय अपघात होता हे ‎दाखवून देत पक्षातील आपले स्थान‎ बळकट केले आहे. पक्षश्रेष्ठींच्या‎ सूचनेविना ते उमेदवारी अर्ज आणणार‎ नाहीत, असा राजकीय निरीक्षकांचा‎ कयास आहे. उमेदवारीबाबत राजेंद्र राऊत‎ यांनी अधिकृत कसलेच मत जाहीर‎ केलेले नाही. भाजपच्या रणनितीचा ‎भाग…

Read More

निर्मल मनाद्वारे भगवंताची प्राप्ती- राजेशकृष्ण महाराज:माहेश्वरी महिला मंडळातर्फे पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद् कथा‎

ज्याप्रमाणे भगवंत प्राप्तीसाठी संतसंगतीची गरज असते, त्यापेक्षाही जास्त निर्मळ मनाची सर्वप्रथम गरज असते. निर्मल स्वच्छ व मनाच्याद्वारे भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ज्याचे मन सरळ व प्रामाणिक असते, त्याला भगवंत सर्वात आधी प्रसन्न होतात, अशा निर्मळ मनाची कामना प्रत्येकाने करावी, असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज यांनी केला. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम…

Read More

संभाजीनगर-जालना विधान परिषदेसाठी 33 इच्छुकांकडून 55 अर्ज:भरला कुणीच नाही, सोमवारी उलगडणार महायुती-मविआचा सस्पेन्स

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत 33 इच्छुकांनी 55 अर्ज नेले, परंतु एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याचा सोमवार (1 जून) हा अंतिम दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी उसळणार आहे. महायुती व महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने उत्सुकता वाढली असून, सोमवारीच प्रत्यक्ष अर्ज भरताना सर्व चित्र स्पष्ट होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या…

Read More

गोपालकाला हा समाजात असणारे भेदभाव नष्ट करतो:देशमुख महाराज, विठ्ठल मंदिर येथे भागवत सप्ताह‎

जुने शहरात श्री विठ्ठल मंदिर येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या भागवत सप्ताहामध्ये सहाव्या पुष्पात हभप सुजित महाराज देशमुख यांनी भागवत कथेमधील श्रीकृष्णाच्या बाललीला स्कंध उलगडून सांगितले. गोपालकाला हा समाजातील भेदभाव नष्ट करतो, असे ते म्हणाले. यावेळी गोपालकाला व गोवर्धन पूजा करण्यात आली. भगवान श्रीकृष्ण नंदराजा, यशोदे कडे जसेजसे मोठे होतात तसे त्यांच्या बाल लिलांचे सुंदर…

Read More

डबल ढोलकी सरकारने हातात घंटा देण्याचे काम केले:जरांगे पाटलांच्या उपोषणावरून विजय वडेट्टीवारांची टीका; सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी- लक्ष्मण हाके

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि मराठा अभ्यासक व जरांगे यांच्यात रात्री 10.30 वाजेपासून चर्चा सुरू झाली. अडीच तासांच्या चर्चेनंतर सरकारने सर्व मागण्या मान्य असल्याचे…

Read More

अवैध व्यवसाय बंद करा; अन्यथा मोर्चा:दहीहंडा विकास मंचाचा इशारा, पोलिस प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन‎

ऐतिहासिक, सामाजिक आणि क्रांतिकारी वारसा लाभलेल्या दहीहंडा परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी दहीहंडा विकास मंचाने पोलिसांकडे केली आहे. याबाबत मंचाने ठाणेदार गोपाल ढोले यांना निवेदन सादर केले. अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मंचाने दिला आहे. आज खुलेआम वरली मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर अवैध…

Read More

कुलगुरू ई-बाईक, कुलसचिव आले सायकलने:विद्यापीठाच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मिळाला पर्यावरण स्नेही प्रतिसाद‎

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष आवाहनाला प्रतिसाद देत, शनिवारी ३० मे रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘नो व्हिकल डे’ (वाहनमुक्ती दिन) पाळण्यात आला. त्यामुळे कुलगुरु ई-बाईकने तर कुलसचिव हे सायकलने प्रवास करित कार्यालयात दाखल झाले. दर शनिवारी नो व्हेईकल डे पाळण्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच केली होती. त्या…

Read More

जिल्हाधिकारी यांची अभिनव संकल्पना:प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बदल्या, 41 कर्मचारी, 5 मंडळ अधिकारी यांचा समावेश‎

जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात ऑनलाईन समुपदेशनाद्वारे करण्यात आल्या. हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच झाला. त्याद्वारे पात्र ४१ कर्मचाऱ्यांपैकी सर्व एक्केचाळीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मंडळ अधिकारी संवर्गात ५ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली. ग्राम महसूल अधिकारी संवर्गात ८२ पात्र कर्मचाऱ्यांची बदली झाली. महसूल सहायक संवर्गात ३९ पात्र कर्मचाऱ्यांची…

Read More

परिवर्तनाच्या संघर्षात प्रमुख मूक शक्ती बनून कार्यरत होत्या रमाई:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या समारोपप्रसंगी एम.डी. सरोदे यांचे प्रतिपादन‎

त्यागमूर्ती माता रमाईंचे जीवन हे केवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची पत्नी म्हणूनच नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाच्या महान संघर्षामागील एक मूक शक्ती म्हणून त्या कार्यरत होते. रमाईंच्या जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक होते. अनेक संकटे, मुलांचे निधन, आर्थिक अडचणी आणि एकाकीपणा सहन करूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. बाबासाहेबांच्या ध्येयावर त्यांचा अढळ विश्वास होता. म्हणूनच…

Read More

अ.भा.मराठी साहित्य संमेलन अचलपूर येथे घेण्याची मागणी:विदर्भ साहित्य संघाला जितेंद्र रोडे यांचे निवेदन‎

साहित्य, कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या अचलपूर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात यावे, अशी मागणी महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांनी केली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नवनियुक्त संचालिका डॉ. जयश्री कुळकर्णी यांचे अभिनंदन करत त्यांच्यामार्फत हे निवेदन संघाकडे सादर करण्यात आले. निवेदनानुसार अचलपूर नगरीला साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा…

Read More