Headlines

संभाजीनगर-जालना विधान परिषदेसाठी 33 इच्छुकांकडून 55 अर्ज:भरला कुणीच नाही, सोमवारी उलगडणार महायुती-मविआचा सस्पेन्स




छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत 33 इच्छुकांनी 55 अर्ज नेले, परंतु एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याचा सोमवार (1 जून) हा अंतिम दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी उसळणार आहे. महायुती व महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने उत्सुकता वाढली असून, सोमवारीच प्रत्यक्ष अर्ज भरताना सर्व चित्र स्पष्ट होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अर्ज घेतला असून, यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. घोडेले यांनी एक अर्ज अपक्ष म्हणून तर एक अर्ज पक्षासाठी घेतला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे घोडेले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. घोडेले हे गेल्या काही काळापासून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेच्या वतीने या जागेची मागणी करण्यात आली असली, तरी भाजपकडून ही जागा लढवण्यात येणार असल्याचा स्पष्ट निरोप शिवसेनेला देण्यात आला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आम्ही जागा सोडणार नाही- अतुल सावे संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेनेने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, भाजपने आता ही जागा स्वतःच लढवणार असल्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. याबाबत ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, “आमचे संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे आम्ही ही जागा सोडणार नाही.” आम्ही पक्षाकडे याबाबत रीतसर मागणी केली असून ही जागा आम्हीच लढणार असल्याचा पुनरुच्चार सावेंनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *