![]()
नवी मुंबईतील तुर्भे येथे नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या एक्स्पायरी (मुदत समाप्ती) तारखा बदलून ते पुन्हा बाजारात विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पर्दाफाश केला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या टोळीकडून ७६ ल
.
एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २४ ते २९ ऑगस्टदरम्यान तुर्भे येथील “मेसर्स साधना एंटरप्रायझेस’वर हा संयुक्त छापा टाकला. या ठिकाणी मुंबई, नवी दिल्ली आणि नोएडामधील १० प्रमुख निर्यातदार कंपन्यांच्या उत्पादनांची साठवणूक आणि लेबल्समध्ये बेकायदेशीरपणे फेरफार केला जात असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडक कारवाईमध्ये घटनास्थळी काय-काय सापडले?
या धडक कारवाईत अधिकाऱ्यांनी ७५ लाख २१ हजार २६९ रुपये किमतीचे अन्नाचे तब्बल ४,९४२ बॉक्स जप्त केले. याशिवाय १ लाख ३० हजार ६०० रुपये किमतीचा लेबल नसलेला व मुदत संपलेला मालही हस्तगत करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये लहान मुलांच्या आवडीचे वेफर्स, बटाटा चिप्स, एका लोकप्रिय ब्रँडचे नूडल्स, सूप, मेयोनिजची पाकिटे आणि मोठ्या शीतपेयांच्या कॅन्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.