Headlines

खेळणा, केळगाव आणि चारनेर वगळता 5 प्रकल्प कोरडेठाक:भविष्यात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार‎




सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पाशिवाय इतर प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे. खेळणा मध्यम प्रकल्पातून सिल्लोड शहरासह परिसरातील बारा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणात सद्य:स्थितीत ८३% उपयुक्त जलसाठा असल्याने किमान सिल्लोड शहरासह या धरणावर अवलंबून असलेल्या बारा गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. परंतु तालुक्यातील दुसरा मध्यम प्रकल्प असलेल्या अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्पात सध्या केवळ २.७१ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. यंदा तब्बल एक महिना उशिराने तालुक्यात पावसाला सुरुवात झाली होती. मात्र पाणलोट क्षेत्रात अपेक्षित जोरदार पाऊस न झाल्याने प्रकल्पात पाण्याची आवक अत्यल्प राहिली. पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *