Headlines

फुलंब्रीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह 13 नगरसेवकांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश:ठाकरे गटाचे 7, काँग्रेसचे 4 तर श.प. चा 1, आता विरोधी पक्षच उरला नाही



फुलंब्री नगरपंचायतीच्या राजकारणात मंगळवारी मोठी उलथापालथ झाली. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे व काँग्रेसचे उपनगराध्यक्ष जमीर पठाण यांच्यासह १३ नगरसेवकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिंदे गटात प्रवेश के

.

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे ७, काँग्रेसचे ४, तर शरद पवार गटाचा १ असे १२ नगरसेवक आणि १ स्वीकृत सदस्य आहे. याशिवाय पंचायत समितीची एक सदस्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

ठाकरे गटाच्या नगरसेविका अर्चना दुतोंडे, राणी घोडके, सुशमेश प्रधान, सय्यद मसरत जफर, शेख सना कौसर उमर, पठाण जावेद याकूब खान, शहा अन्नो बी जमील व स्वीकृत सदस्य शेख आसिफ यांनी शिंदे गटात प्रवेश केला. काँग्रेसचे उपनगराध्यक्ष जमीर पठाण, प्रशांत नागरे, खान अरशिया रिजवान, पटेल हिना मुदस्सीर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कुरेशी हलिमाबी अब्दुल मजीद यांचा यात समावेश आहे.

तसेच ठाकरे गटाच्या पंचायत समिती सदस्या वंदना रामटेके, बाजार समितीचे संचालक अजहर सय्यद व श्रीराम म्हस्के यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. फुलंब्री नगरपंचायतीत एकूण १७ नगरसेवक आहेत. तसेच दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. शिंदेसेनेकडे एकही नगरसेवक नव्हता. तर भाजपचे ५ नगरसेवक आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *