Headlines

13 लाखाचे व्हेंटिलेटर 22 लाखात केले खरेदी!:डॉ. देशमुख यांचा आरोप, ‘जीएमसी’चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर‎




डफरीन हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटरच्या स्फोटाचे प्रकरण ताजे असतानाच आरोग्य विभागातील नवे प्रकरण पुढे आले आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने खरेदी केलेल्या व्हेंटिलेटरच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. जीएसटीसह १३.१२ लाख रुपये मूळ किंमत असलेले व्हेंटिलेटर तब्बल २२.५५ लाख रुपयांत खरेदी केले गेले. असा आरोप राज्याचे अर्थ व नियोजन खाते सांभाळलेले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी या संदर्भात सप्रमाण आरोप केला असून वेगवेगळ्या व्हेंटिलेटर कंपन्यांकडून कोटेशन मागवून ही बाब अधिक विस्ताराने स्पष्ट केली आहे. हॅमिल्टन सी-थ्री या कंपनीचे हे व्हेंटिलेटर असून ही खरेदी शहरातील या कंपनीच्या अधिकृत डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांचेमार्फत न करता वाशीमसारख्या तुलनेने छोट्या शहरातील निर्मल एजन्सी या पुरवठादाराकडून करण्यात आल्याची गंभीर बाबसुद्धा पुढे आली आहे. अधिक खोलात गेल्यानंतर निर्मल एजन्सीज शॉप नं ४, महावीर कॉम्प्लेक्स, अकोला नाका, वाशीम. या पत्त्यावर सदर डीलर ऐवजी जैन भवन नावाची इमारत आढळून आली. या इमारतीमध्ये एका विंगेत चार नंबरच्या दुकानात एका ठिकाणी किराणा दुकान व दुसऱ्या विंगेतील चार नंबरच्या दुकानांमध्ये तिखट, हळद विक्रीचे दुकान आढळून आले. अशा रीतीने ज्या एजन्सीने या २० व्हेंटिलेटरचा तब्बल ४.५० कोटी रुपयांचा पुरवठा केला. त्याचे प्रतिष्ठान दिलेल्या पत्त्यावर असल्याचे आढळून आलेले नाही त्यामुळे ही खरेदी अधिकच संशयाच्या भोवऱ्यात आलेली आहे. कोणीही या…ओरबाडून पैसै खा ^हा प्रकार म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय, असा आहे. अमरावतीत तो वाढीस लागला आहे. महानगर पालिकेमध्येसुद ्धा प्रशासक काळात अशीच अनागोंदी झाली. मागील आयुक्तांनी स्वच्छतेचा कंत्राट वादग्रस्त कोणार्क कंपनीला सात वर्षाकरिता देऊन टाकला आणि इथून निघून गेल्या आणि सत्यानाश करून टाकला. कोणीही या…ओरबाडून पैसे खा…आणि निघून जा…ही मनोवृत्ती बनली आहे. – डॉ. सुनील देशमुख, माजी पालकमंत्री.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *