![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रात्री त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे, मराठा आरक्षण उपसमिती आंतरवालीत पोहोचली नसल्याने संताप व्यक्त होत होता. दरम्यान, सोलापुरात मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा आंदोलकांनी रोखला होता. मसुदा जरांगेंकडे- विखे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, आ. प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगर येथे म्हणाले की,58 लाख नोंदींबाबत प्रस्तावाचा मसुदा जरांगेंना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिला आहे. त्यात त्यांना कोणत्या त्रुटी वाटतात. काय बदल हवे हे त्यांनी बुधवारी सकाळपर्यंत सांगावे. त्यानंतर त्यांच्याशी पुढील चर्चा होऊ शकते. मराठा समाजासाठी सर्वाधिक निर्णय मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनेच घेतले आहेत, असेही विखे पाटील, सामंत आणि लाड यांनी सांगितले. ओबीसी महाएल्गार मोर्चा दौंडमध्ये रोखला; पाटसच्या टोलनाक्यावर अडीच तास तणाव पुणे |दौंड तालुक्यातील पाटस येथून मुंबईच्या दिशेने लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात निघालेल्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारल्याने पाटस टोलनाक्यावर मंगळवारी सकाळी सुमारे अडीच तास तणावाचे वातावरण निर्माण झाले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एक-दोन दिवसांत मोर्चा मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. हाके म्हणाले की, अत्यंत कमी शिकल्यामुळे जरांगे शिवराळ भाषेत बोलत आहेत. जरांगेंच्या आंदोलनाला सरकारच जबाबदार- वडेट्टीवार दरम्यान, नाशिक येथे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, जरांगेंच्या आंदोलनाला सरकारच जबाबदार आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका दुटप्पी आहे. ओबीसींना जाती-जातींत विभागून दाबण्याचे काम सुरू आहे.
Source link
संतप्त मराठा आंदाेलकांचा टायर पेटवून जालना, बीडला रास्ता राेकाे:उपोषणाचा चौथा दिवस, मंत्र्यांची उपसमिती आंतरवालीत पोहोचलीच नसल्याने संताप, साेलापुरात मंत्री गाेरेंचा ताफा अडवला