![]()
बिर्ला कॉलनीच्या परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो. विदर्भ कॅरम असोसिएशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजीतसिंग बछेर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाचे महत्त्व सांगितले. “खेळ केवळ शारीरिक सुदृढता देत नाही, तर ते आपल्याला शिस्त, समर्पण, नेतृत्व आणि संघ भावनेचेही धडे देतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी हे सर्व गुण महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांच्यात क्रीडा भावनेची वाढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे क्रीडा प्रमुख स्वप्निल अंभोरे व क्रीडा शिक्षिका अंजली धानोकार यांनी केले. या कार्यक्रमांतर्गत एक तास मैदानावर हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे विविध खेळ घेण्यात आले. सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रभजीतसिंग बछेर हे होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दिक्षीत होत्या. दुपारच्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे क्रीडा प्रमुख स्वप्निल अंभोरे होते. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सूत्रसंचालन विद्यार्थिनी धनश्री हलवणे व ईश्वरी गावंडे यांनी केले. दुपारच्या सत्रात शिक्षक गजानन पोटे यांनी केले. विद्यार्थी, शिक्षकांनी घेतली फिट इंडिया शपथ शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी फिट इंडिया शपथ घेऊन रोज ३० मिनिटे खेळण्याचा संकल्प केला. प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमात स्वप्निल अंभोरे यांनी खेळाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दिक्षीत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी कार्यक्रमाला प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल, निशांत वानखडे उपस्थित होते.
Source link
खेळातून मिळतात शिस्त, समर्पण, नेतृत्वासह संघ भावनेचे धडे- बछेर:बिर्ला कॉलनीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा