Headlines

Admin

तात्पुरता दिलासा:जीवघेण्या उकाड्यानंतर पावसाच्या सरी, दहा ते पंधरा मिनीटाच्या पावसाने अनेक भागात वीज खंडित‎

तब्बल महिनाभराच्या जीवघेण्या उकाड्यानंतर आज अमरावतीकरांना पावसाने तात्पुरता दिलासा दिला खरा, पण त्याचसोबत महावितरणच्या ‘ढिसाळ’ कारभाराचे वाभाडेही काढले आहेत. मंगळवारी (दि. २६) दुपारी तीन वाजताच्या सुमारास शहरात जवळपास सर्वच भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, केवळ १० ते १५ मिनिटे पडलेल्या या पहिल्याच पावसाने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून शहरातल्या अनेक भागांतील…

Read More

आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत पोहोचली मुस्कान:लोकांनी म्हटले – चुकीचे काम करत असेल, नंतर इन्स्पेक्टर अविनाशमध्ये पाहून अभिमान वाटला

अभिनेत्री मुस्कान वर्माने छोट्या शहरातून, रुरकीतून बाहेर पडून मुंबईत स्वतःची ओळख निर्माण केली. संगीत शिकणाऱ्या मुस्कानच्या मनात अभिनयाचे स्वप्न तिच्या आईने जागवले, ज्या स्वतः अभिनेत्री बनू इच्छित होत्या. सुरुवातीच्या दिवसांत तिला संघर्ष, नकार आणि लोकांचे टोमणे सहन करावे लागले, पण तिने हार मानली नाही. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमधील बिन्नीच्या भूमिकेने तिला नवी ओळख दिली….

Read More

वाशीमसाठी 5 लाख 62 हजार लिटर इंधन साठा:नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन‎

जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आवश्यक तेवढ्याच इंधनाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी २४ मे रोजी विविध तेल कंपन्यांकडून जिल्ह्याला एकूण ५ लाख ६२ हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन सर्व तेल कंपन्या…

Read More

जनतेसाठी लढणार; सुधाकर भारसाकळे शिंदेसेनेत जाणार, काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी‎

अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावशाली नेतृत्व तसेच काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेत शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील माहेश्वरी भवन येथे संवाद मेळाव् . काही दिवसांपूर्वीच त्यांनी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध चर्चांना उधाण…

Read More

भारताला मागे टाकून तैवान 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला:नीलम मीना बंगालच्या नवीन मुख्य निवडणूक अधिकारी; 27 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. क्वाड देशांनी क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्कवर MoU वर स्वाक्षरी केली आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 2. तैवान जगातील 5वी सर्वात मोठा शेअर बाजार बनला 3. भारत आणि कॅनडाने ‘CEPA 2030’ लक्ष्य निश्चित केले नियुक्ती (APPOINTMENT) 4. नीलम मीणा यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती…

Read More

सांगोल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या:आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मंत्रालयात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घेतली भेट‎

सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज मुंबई येथे कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेत तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी…

Read More

विठ्ठल मंदिराच्या जतन व संवर्धनाची कामे महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश:आषाढी वारीकाळात गॅस,इंधन टंचाई भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाणार‎

श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत पडसाळ, देणगी कक्ष, अर्ध मंडप येथील पायऱ्या ही कामे २५ जून पर्यंत पूर्ण करावीत. तसेच पश्चिमद्वारचे काम तात्काळ सुरू करून आषाढी वारी पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस कार्ति . . इंधन पुरवठा: सोलापूर जिल्ह्यात डिझेल पेट्रोल व गॅसची टंचाई नसून, पुरवठा सुरळीत सुरू…

Read More

चंद्रभागा नदीपात्रात कारवाई, 15 मजुरांसह 19 जणांवर गुन्हा:उत्तर प्रदेशच्या मजुरांना स्थानिक लावले होते कामाला‎

पवित्र चंद्रभागा नदीच्या पात्रातून थर्माकोलच्या तराफ्याच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू उपसा आणि साठा करणाऱ्या टोळीवर पंढरपूर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अंबाबाई पटांगण बंधाऱ्यालगत उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील तब्बल १५ मजुरांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. या परप्रांतीय मजुरांसह त्यांना कामाला लावणाऱ्या पंढरपूरच्या ४ स्थानिक वाळू मालकांवर गुन्हा…

Read More

मोठा करार:भारत-अमेरिका पृथ्वीतून काढणार दुर्मिळ खनिजे, ‘क्वाड’ बैठकीत आराखडा सादर

पृथ्वीच्या पोटात दडलेल्या “रेअर अर्थ मिनरल्स’वर (दुर्मिळ खनिजे) एकाधिकारशाही गाजवणाऱ्या चीनला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी “क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीव्यतिरिक्त भारत आणि अमेरिकेने एका मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे अमेरिकी समकक्ष मार्को रुबियो यांनी सांगितले की, हे योग्य वेळी उचललेले अत्यंत आवश्यक पाऊल आहे. जयशंकर यांच्या मते, या फ्रेमवर्कमध्ये दुर्मिळ खनिजांचे…

Read More

भीमा नदीवर नवीन बॅरेज बंधारे मंजूर करावेत- काळे:पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी‎

भीमा नदीवरील सध्याचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गळतीमुळे कुचकामी ठरत असून, उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून भीमा नदीवर नवीन बॅरेज बंधारे मंजूर करावेत, अशी मागणी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी राज्याचे ग्रामविकास व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्री…

Read More